जिल्हापोलिस अधीक्षकाची कारवाई
परभणी (Parbhani):- जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील कैद्याचा संशयास्पद मृत्यू (suspicious death) झाला होता. या कैद्याच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या पाच पोलीस अंमलदारांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सोमवार ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आदेश काढले आहेत. निलंबन करण्यात आलेल्या कर्मचार्यांमध्ये एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, एक पोलीस हवालदार, एक पोलीस नाईक आणि दोन पोलीस शिपाई (soldier) आहेत.