मुंबई (Flamingo Bird) : मुंबईतील घाटकोपरमध्ये (Plane Accident) विमानाची धडक बसून 40 फ्लेमिंगोचा (Flamingo Bird) मृत्यू झाला. एमिरेट्स एअरलाइनने सोमवारी फ्लेमिंगोच्या कळपातून उड्डाण केल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. फ्लेमिंगोचा कळप ठाणे फ्लेमिंगो अभयारण्याच्या दिशेने जात असताना विमानाची धडक बसली असल्याचे समजते. बांधकाम किंवा प्रदूषणामुळे (Flamingo Bird) फ्लेमिंगोने त्यांच्या उड्डाणाचा मार्ग बदलला असावा.
या घटनेमुळे मुंबई विमानतळावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. दुबईसाठी एमिरेट्स फ्लाइट क्रमांक 509 आता मंगळवारी म्हणजेच आज रात्री 9 वाजता निघणार आहे. प्रवाश्यांना विमान कंपनीने (Airline company) प्रक्रियेनुसार राहण्याची सोय केली आहे. विमानाच्या पायलटचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. महाराष्ट्र (Forest Department) वनविभागाने या घटनेचा तपास सुरू केला असून, ज्या ठिकाणी फ्लेमिंगोचे मृतदेह आढळून आले. त्या ठिकाणाहून अधिका-यांनी नमुने गोळा केले आहेत. वनविभागाचे आणखी एक पथक अमिरातीचे विमान उडवणाऱ्या पायलटचे बयाण नोंदवणार आहे.
अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एसव्ही रामाराव यांनी सांगितले की, आमची टीम घटनास्थळी आहे आणि (Flamingo Bird) फ्लेमिंगोच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी संपूर्ण तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या वैमानिकाने पक्ष्यांच्या धडकेची माहिती दिली. दुबईहून येणारे फ्लाइट ईके 508 सुखरूप उतरले. ही घटना मुंबईतील पंतनगरमधील लक्ष्मी नगर परिसरात घडली. सोमवारी रात्री उशिरा दुबईचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले. कारण विमान पूर्ण तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आले होते.