परभणी (Parbhani):- आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शनिवार १८ जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात(Government Medical Colleges) बैठक घेवून विविध बाबींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी समस्या सोडविण्याबाबत आश्वासन दिले.
मेघना बोर्डीकर यांनी घेतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा
बैठकीला महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विविध समस्या ना. बोर्डीकर यांच्या समोर सादर केल्या. यावर ना. बोर्डीकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. बैठकीला डॉ. विद्या चौधरी, सुनिल देशमुख, रितेश जैन, गजानन काळे यांची उपस्थिती होती.