रास्त भाव दुकानदारांचे थकले सात ते आठ कोटी रुपये
हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : डिसेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ पर्यंतचे कमिशन राशन दुकानदारांना मिळाले नसल्याने आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांच्या नेतृत्वाखाली रास्त भाव दुकानदाराच्या शिष्टमंडळाने २६ ऑगस्ट रोजी मुंबईत ना. छगन भुजबळ व अप्पर सचिवांची भेट घेवून व्यथा मांडली.
हिंगोली जिल्ह्यामध्ये ८९० राशन भाव दुकानदार आहेत. जिल्ह्यातील राशन दुकानदारांनी डिसेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रति १५० प्रमाणे जवळपास ८ ते ९ कोटी रुपये जिल्हा पुरवठा विभागामार्फत अद्यापपर्यंत कमिशन देण्यात आले नाही. अनेक वेळा जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा करूनही कमिशन मिळाले नाही. त्यामुळे आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांच्या नेतृत्वात २६ ऑगस्ट रोजी मुंबईत ना. छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाचे अप्पर सचिव गायकवाड यांची भेट घेण्यात आली.
यावेळी आ. मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी रास्त भाव दुकानदाराच्या व्यथा मांडून त्यांचे कमिशन तात्काळ देण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी शिष्टमंडळात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भिकुलाल बाहेती, सचिव अशोक काळे यांचा समावेश होता. या प्रसंगी ना. छगन भुजबळ यांनी रास्तभाव दुकानदारांच्या व्यथा ऐकूण घेतल्यानंतर लवकरच त्यांचे कमिशन दिले जार्ईल अशी ग्वाही देखील दिली.




