परभणी (Parbhani) :- पैशाच्या कारणावरुन बळजबरीने पळवून नेत १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार (torture) करण्यात आला. घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुला खतम करुन टाकीण, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना मानवत तालुक्यातील एका गावात घडली. सदर प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन ११ फेब्रुवारीला आरोपीवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
परभणीतील मानवत तालुक्यातील घटना..!
पिडित १९ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने पिडितेच्या घरुन बळजबरीने पैशाच्या कारणावरुन पळवून नेले. मानवत तालुक्यातील एका गावामधील ऊसाच्या शेतात पिडितेवर बळजबरी अत्याचार केला. घडला प्रकार “कोणाला सांगितला तर तुला खतम करुन टाकीन” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन चंदू काळे याच्यावर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.




