चिखली (Buldhana) :- तालुक्यातील शेतकरी सलग चार ते पाच वर्षा पासून दुष्काळाचा सामना करत आहे. त्यामुळे सरकारने सक्तीची वसुलीला ब्रेक लावला होता. त्यातच निवडणुका (Elections) असल्याने राज्य सरकारने दुष्काळी तालुक्यांत सक्तीची वसुली केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र असे असताना विधानसभा निवडणुका आटोपताच चिखली तालुक्यातील सहकारी बँके सक्तीने वसुली करत थकीत पिककर्जदार शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन वसुली भरण्याचा तकादा लावला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या खाईत सापडलेला शेतकरी (Farmer)अधिक अडचणीत आला आहे .
सतत दुष्काळ परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे उत्पादनात मोठी घट
चिखली तालुक्यात मेरा बु येथे जिल्हा सहकारी बँक आहे या बँकेकडून (Bank)शेतकऱ्यांनी 2012 पूर्वी पिक कर्ज घेतले होते. मात्र सतत दुष्काळ परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. त्यामुळे सततची नापीकी व कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्यांकडून बँकेच्या पिककर्जाची परतफेड करता आली नाही. त्यातच 2012 मध्ये जिल्हा बँक एन पी ए मध्ये गेली असल्यामुळे रिझर्व बँकेने (Reserve Bank) जिल्हा बँकेला कर्ज पुरवठा बंद केला. त्यामुळे जिल्हा बँककडून शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप केले नाही. जिल्हा बँक कडून पिक कर्ज वाटप बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी जवळच असलेल्या राष्ट्रीयकृत बँक मध्ये खाते काढून पिककर्ज घेतले. त्यामुळे सततची नापीकी आणि दुष्काळ परिस्थिती पाहुणे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखा पर्यत पिककर्ज माफी दिली.
जाचक अ्टीमुळे शेकडो शेतकरी पिक कर्ज माफी योजनेपासून वंचीत
परंतु या माफी मध्ये जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 25 ते 50 हजारा पर्यत पिक कर्ज वाटप केलेल्या शेतकऱ्यांना सरकारने लावलेल्या जाचक अ्टीमुळे शेकडो शेतकरी पिक कर्ज माफी योजनेपासून वंचीत राहावे लागले .या बँकेचे कर्मचारी गेल्या चार वर्षा पासून वसुली साठी शेतकऱ्यांच्या दारात गेले नव्हते परंतु आता नुकत्याच विधानसभा निवडणुका (Assembly elections) आटोपताच जिल्हा बँकेचे बँक व्यवस्थापक व कर्मचारी थकीत पिककर्ज दार शेतकऱ्यांच्या घरोघरी जावून थकीत कर्ज भरा अशी सक्तीची वसुली सुरु केली आहे. एकीकडे गेल्या चार ते पाच वर्षा पासून झालेली नापीकी व कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे असे असतांना मात्र जिल्हा बँकेकडून सक्तीच्या वसुली केली जात आहे. त्यामुळे सरकारने जिल्हा बँकेने सुरु केलेली सक्तीची वसुली तात्काळ थाबवून सन 2012 पर्यत थकीत असलेले शेतकरी खातेदार यांना सरसकट पिक कर्ज माफीचा लाभ द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.