हिंगोली (Forest department) : शहरामध्ये मागील काही दिवसांपासून लाल माकडाच्या टोळीने धुडगुस घातला होता. एनटीसी भागामध्ये एका खाजगी रुग्णालयात लाल माकडाने धुडगुस घातला असता (Forest department) वनविभागाला माहिती देताच पथकाने घटनास्थळी जावून लाल माकडाला पकडले.
हिंगोली शहरातील एनटीसी भागातील मुक्ताई हॉस्पीटलमध्ये एका लाल माकडाने धुडगुस घालताच त्याची माहिती डॉ. पवार यांनी (Forest department) वनविभागाला दिली. यावेळी विभागीय वनअधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसरंक्षक सचिन माने, हिंगोली प्रादेशीक वनपरिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्रीकृष्ण चव्हाण, सारंग शिंदे व वनमजुर भालेराव यांच्या (Forest department) पथकाने लाल माकडाला ताब्यात घेवून जंगलात नेवून सोडले.