वृक्षतोड करणाऱ्यांच्या उरात भरली धडकी
कळमनुरी (Forest department) : सध्या वन विभागाच्या वतीने दमदार कारवाई केली जात असताना २ फेब्रुवारीला कळमनुरी शिवारात अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या लाकडासह टेंम्पोला पकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी (Forest department) वन विभागाच्या अखत्यारित जमिन आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली असताना काही (Forest department) नागरीक अवैधरित्या वृक्षांची तोड करून त्याची सर्रास विक्री करीत असतात, अशा वृक्षतोडीसह होणाऱ्या चोरीवर आळा घालण्याकरीता विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने यांनी वन परिक्षेत्रातंर्गत भरारी पथके व स्थानिक अधिकाऱ्यांची पथके तैनात केली आहेत. २ फेब्रुवारीला कळमनुरी शिवारातून एका टॅम्पोमधून अवैधरित्या लाकुडतोड करून त्याची वाहतुक केली जात असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला मिळाली.
त्यावरून विभागीय (Forest department) वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे सहाय्यक वन अधिकारी सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवार, कर्मचारी काळे, काशिदे यांच्या पथकाने हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी बायपास नजीक वाहन तपासणी मोहीम सुरू केली. ज्यामध्ये टेम्पो क्रमांक एमएच ०४० सीपी ६११२ यामधून अवैधरित्या लाकुडतोड करून वाहतुक केली जात होती. चालकाकडे कागदपत्राची विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने वन विभागाच्या पथकाने लाकडासह टेंम्पो ताब्यात घेतला. (Forest department) वन विभागाने कारवाईचा धडाका सुरु केल्यामुळे अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांना धडकी भरली आहे.