या योजनेअंतर्गत शेतकरी व नागरिकांना अल्प दरात वृक्ष उपलब्ध
पुसद (Forest Department Yojana) : जून जुलै या महिन्यांमध्ये पाऊस चांगला कोसळत असल्यामुळे व एक जुलै रोजी हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक जन्मदिनानिमित्त राज्यभर कृषी दिन (Agriculture Day) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने वृक्ष लागवड व संगोपन करण्याकरिता विविध सामाजिक संघटनांसह शेतकरी व नागरिक ही सरसावतात. तर पुसद उपवन संरक्षक कार्यालय व (Forest Department Yojana) वन विभाग तर्फे मोठ्या प्रमाणात मन परिसरात विविध प्रजातींचे वृक्ष लागवड केली जात असते तर याच पार्श्वभूमीवर शहरातील तहसील परिसरात असलेल्या पुसद उपवनसंरक्षक कार्यालयाच्या प्रांगणात वन विभागामार्फत नागरिकांकरिता शेतकऱ्यांकरिता “अमृत वृक्ष आपल्या दारी ” या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या वृक्ष प्रजातींचे झाडे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या मोहिमेचा शुभारंभ कार्यालयाचे पुसद उपवनसंरक्षक कार्यालयाचे उपवन संरक्षक अधिकारी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. तर नागरिकांकरिता शेतकऱ्यांकरिता अतिशय उत्तम असलेला हा उपक्रम सुरू केल्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. वृक्ष घेण्याकरिता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांसह शेतकरी, घरगुती वृक्ष लागवण्याकरिता शहरातील महिलांची ही मोठी गर्दी उसळलेली दिसत होती. यावेळी प्रामुख्याने पुसद वन प्रांत अधिकारी आरएफओ प्रवीण राऊत, मारवाडी चे आरएफओ झांबरे यांचेही योगदान या उपक्रमांमध्ये दिसत आहे. तर यावेळी पुसद (Forest Department Yojana) वन विभाग कार्यालयातील महिला अधिकारी, राऊंड ऑफिसर जामकर, अन्य एक अधिकारी तर दैनिक देशोन्नती चे प्रतिनिधी दीपक महाडिक हे याप्रसंगी उपस्थित होते.