– विनायक राखडे
अर्जुनी/मोरगाव (Forest laborer Murder case) : तालुक्यातील नवेगाव/बांध पोलीस स्टेशन (Navegaon/Bandh Police) अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय उद्यानातील स्वागत कक्षात नौकरीवरती असलेले (Forest laborer Murder case) वनमजुर सुदाम राखडुजी किरसान हे 17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6:00वाजता चाचेरे गुरुजी सोबत चाहा-पान घेतला तिथून चाचेरे गुरुजी निघून गेले. 7:०० वाजताच्या सुमारास हिलटॉप गार्डनच्या परिसरातील पाण्याच्या टाकीवर गळफास अवस्थेत आढळले. त्यांच्या पायातील चप्पल , डोक्यावरील टोपी, खिशात मोबाईल पेन, जवळ होते यावरून त्यांची हत्या झाल्याची समजून येते, या सबंधाची बातमी दि.03 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
येथे CLICK करा : राष्ट्रीय उद्यानात वन कर्मचाऱ्याची हत्या की आत्महत्या?
माहितीनुसार, मृतकाच्या पत्नी आणि मुला-मुलीने नवेगाव/बांध राष्ट्रीय उद्यानातील (national park) चौपाटीवर दि. 5 मार्च 2024 ला घडलेल्या एका पुरुष व महिलांच्या अश्लील चाळे व्हिडीओ व्हायरल विषयी घटनेची माहिती आणि त्यांच्या मृतक पती वडिलांना मृत्युच्या दिवसी अरविंद नागपूरे, 3 साथीदार भोजू माळगाम,चांदेवार या सर्वांनी मिळून माझ्या पतीचा घातपात केला असल्याचे मृतकांची पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत माहीती दिली. याबाबद मृतांच्या नातेवाईकांनी (Navegaon/Bandh Police) नवेगाव/बांध पोलीसांना दि. 21 एप्रिल 2024 रोजी माहिती दिली होती. तर दि.06 मे 2024 रोजी पोलीसांनी मृतकाच्या कुटुंबीयांना पोलीस स्टेशन ला बोलावून चौकशी व बयान नोंदवुन दोन आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता 1860 अन्वय कलम 306,34 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वय कलम 3(2)(पाच) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन, एका आरोपीला नवेगाव/बांध पोलीसांनी अटक केली होती. मुख्य आरोपी (Arvind Nagpure) अरविंद नागपूरे गुन्हा दाखल झाल्यापासुन आज पंधरा दिवसाचा कालावधी लोटला असला तरी, पण अजुनही फरारच आहे.
मुख्य आरोपीला नवेगाव/बांध (Navegaon/Bandh) व परिसरात मुक्त संचार करतांना नागरिकांनी पाहिले.यामुळे मुख्य आरोपीला पाठबळ कुनाचा आणि पाणी कुठ मुरतयं का असा प्रश्न आता जन सामान्य नागरिकांना पडला आहे?नवेगाव/बांध पोलीस आरोपीला केव्हा अटक करतात याकडे नागरिकांचे आता लक्ष्य लागले आहे. याप्रकरणात आणखी काही मोठे मासे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Arvind Nagpure) अरविंद नागपूरे यांनी ज्या महिला सोबत राष्ट्रीय उद्यानातील चौपाटीवर अश्लील चाळे करण्यासाठी तेथील रुमची शासकीय परवानगी घेतली होती काय? सदर व्हिडीओ भोजू माळगाम याने तयार करून सोशल मीडिया वर पसरवले. या (Murder case) प्रकरणात मृतक सुदाम किरसान यांना गुंतवुण हत्या का? करण्यात आली. मृतक सुदाम किरसान हा अश्लील चाळे करनाराच्या रस्त्यातील काटा तर नव्हता ना?असा ही प्रश्न निर्माण होते आहे. अश्लील चाळे करणारया जोडप्यालाही अटक करण्यात यावे. या (Forest laborer) प्रकरणाची शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाभीर दखल घेऊन दोषींवर कडक कार्रवाई करुन किरसान कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करून उपोषण करण्याचा इशारा आदिवासी समाज बांधवांनी दिला आहे.अशी माहिती पत्रपरिषदेत किरसान कुटुंबीयांनी दिली .