उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत; जिंतूर-सेलू मतदारसंघात खळबळ
परभणी (Jintur-Selu Assembly) : विधानसभा निवडणुकीपासून माजी आ. विजय भांबळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला. मंगळवार १ जुलै रोजी मुंबईत माजी आ. भांबळे यांच्यासोबत (Jintur-Selu Assembly) जिंतूर – सेलू मतदारसंघातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे सत्तेतील महायुती मधील राजकीय पक्षांच्या समिकरणात मोठे बदल होणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.
जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघातील बोर्डीकर – भांबळे हा संघर्ष जिल्ह्यात चर्चेत आहे. (Jintur-Selu Assembly) विधानसभा निवडणुकीच्या नंतर आ. मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी भांबळे यांचा दुसर्यांदा पराभव केला. निकालानंतर आ. मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्री व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. मतदारसंघासोबत जिल्ह्यावर बोर्डीकरांचे वर्चस्व निर्माण झाले.
या घडामोडीनंतर माजी आ. भांबळे व त्यांची टीम महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भांबळे यांना प्रवेश करण्यासंदर्भात हिरवा कंदील देखील दिला होता. तारीख निश्चित होत नसल्याने प्रवेश होणार का नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु या चर्चेला मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भांबळे व त्यांच्या टीमचा प्रवेश करून पूर्णविराम दिला.
प्रवेश सोहळ्याच्या ठिकाणी माजी मंत्री नवाब मलिक आ. राजेश विटेकर यांची उपस्थिती होती. तसेच प्रेक्षा भांबळे, अजय चौधरी विनायक पावडे, रामराव उबाळे, मनीषा केंद्रे, शरद अंभुरे, खंडेराव आघाव, मुरलीधर मते व इतर आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकार्यांनी यावेळी प्रवेश घेतला.