माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची सरकारवर टीका
जागृती शुगरच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
देवणी/ वलांडी (Diliprao Deshmukh) : केंद्र शासनाने एफ.आर.पी.चे दर वाढवले. पण साखरेचे व उत्पादित मालाच्या भाववाढीत खोडा घालण्याचे काम सरकारने कौशल्याने केल्याची खरमरीत टीका जागृती शुगरचे संस्थापक चेअरमन तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) यांनी केली. ते देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर ॲड अलाईड इंडस्ट्रिजच्या १३ व्या गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी ते रविवारी बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर जागृतीचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, रेणाचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील, जिल्हा बॅकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, गजानन भोपनिकर, मांजरा परिवाराचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, सुग्रीव लोंढे, सोनू डगवाले, मालवा घोनसे, बालाजी बोंबडे उपस्थित होते. यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) म्हणाले की. सामजिक बांधीलकी म्हणून एक पाऊल पुढे टाकून आम्ही जागृतीने एफ आर.पी.पेक्षा 72 कोटी रूपये जास्तीचे देऊन जागृतीच्या सभासद शेतक-यांना दिले व शेतक-यांसह परीसरातील देवणी उदगीर, निलंगा, शि.अनतपाळ तालूक्यातील बाजारपेठेसह शेतमजूर कामगारांच्या जीवनात आर्थिक क्रांती केली.

या वेळी जागृतीला जास्ती जास्त ऊस पुरवठा करणा-या शेतक-यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला या मध्ये पाटील शकूंतला दिलीप साकोळ यांनी सर्वाधिक ९०५ मे टन ऊस पुरवठा तर द्वितीय ईटकर सुभाष भिमरार घुग्गी ८६५ मे.ट. हार्वेस्टर द्वारे मोरे मधूकर श्रीपतराव चलबुर्गा यांनी १६०८०० मे.टन.ऊस देऊन १ कोटींचा व्यवसाय केले तर ट्रक च्या माध्यमातून जाधव विजय गंगाधर यांनी २९४० मेट्रीक टन बिरादार, आकाश चद्रेशेखर हाणमंतवाडी २४४१, मे ट. पवार गणेश ऊत्तमराव ४२६०मे ट.ऊस जाधव लखन शिवाजी मुबारकपूर ३२२५ मे. टन लहाण ट्रॅक्टरमध्ये चव्हाण शेषेराव हिरामन ३०८४ मे ट. ऊस पुरवठा करणा-या ऊस पुरवठा करणा-या पुरवठा दारांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक येवले जी. जी. यांनी केले. मागील वर्षी जागृतीने दैनंदिन ५००० मे.ट.गाळप करून ७ लाख २ हजार मे.ट. गाळप केले दर २७६५ रूपये,भाव दिल्याचे सांगितले. आभार प्रा. भगवान गायकवाड यांनी व्यक्त केले.
नूतन हरवेस्टरचे पूजन
यावेळी जागृती शुगर ने घेतलेल्या नूतन चार हार्वेस्टरचे पूजन मजी मंत्री व जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) व अन्य मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.




