अर्जुनी/मोरगाव(Gondia) :- राज्याचे लोकप्रिय माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री (Former Guardian Minister)आणि अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजकुमार बडोले फाउंडेशन आणि आशा हॉस्पिटल नागपुर द्वारा यांच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले.
माजी मंत्री राजकुमार बडोले फाउंडेशन च्या वतीने भव्य निःशुल्क आरोग्य शिबिर
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणुन अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी भव्य निःशुल्क (Free) आरोग्य शिबिराचे आयोजन आज दि.16 ऑगस्ट 2024 रोजी शुक्रवार ला सकाळी 9:00 ते दुपारी 2:00 वाजता पर्यंत ताडगाव रोड पोस्ट ऑफिस (Post office) जवळ अर्जुनी/मोरगाव येथे करण्यात आले. सदर आरोग्य शिबिरात कैन्सर(Cancer), ह्रदयरोग, हड्डीरोग, कान, नाक, घसा, बालरोग, स्रीरोग, दंत रोग आणि मानसिक रोगाचे निदान करुन उपचार करण्यात आले. या आरोग्य शिबिराला अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील एकुण 2 हजार 87 नागरिकांनी नि:शुल्क आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सदर आरोग्य शिबिराचे आयोजन केले . रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा असल्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.