अन्यथा पोहरादेवी येथे रास्ता रोको आंदोलन; तहसिलदार यांना निवेदन
मानोरा (Sanjay Rathod) : बंजारा समाजाचे नेते विकास पुरुष माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा महायुती आघाडीने मंत्रिमंडळात समावेश करावा, अन्यथा तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे १६ डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराचे निवेदन तहसीलदार यांना शनिवारी बंजारा शिक्षण सेवा अभियानाचे राष्ट्रीय प्रचारक महंत रमेश महाराज यांनी दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पालकमंत्री असताना ७०० कोटी पेक्षा जास्त निधी शासनाकडून मंजूर करून आणून बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरीचा विकास करून कायापालट केला आहे. त्याच बरोबर राज्यासह यवतमाळ व वाशीम जिल्हयात सुध्दा मोठया प्रमाणात विकासाची कामे, अनेकांचे प्रश्न मार्गी लावली आहेत. त्यामुळे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना महायुतीने मंत्रीपद द्यावे, अन्यथा पोहरादेवी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा निवेनाद्वारे तहसीलदार यांना देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रतीलिपी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, ठाणेदार यांना दिल्याचे निवेदनात नमूद केले आहे.