हिंगोली(Hingoli) :- दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला (BJP)जयश्रीराम केल्यानंतर माजीमंत्री सूर्यकांता पाटील (Former Minister Suryakanta Patil) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंगळवारी प्रवेश घेतला. यावेळी शरद पवारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अन्य नेते उपस्थित होते.
सूर्यकांता पाटील या जवळपास नऊ वर्षांपासून भारतीय जनता पक्षात होत्या
२०१४ पासून राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर गेलेल्या सूर्यकांता पाटील या जवळपास नऊ वर्षांपासून भारतीय जनता पक्षात होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोलीची जागा भाजपऐवजी शिंदेच्या शिवसेनेला (Shivsena) सुटली. या प्रकारामुळे नाराज असलेल्या नेत्यांच्या यादीतील सूर्यकांता पाटील हे सुद्धा एक नाव आहे. एरव्ही समाज माध्यमांवर मुखर राहणार्या सूर्यकांताताई या अनेक वेळा भारतीय जनता पक्षाच्या चुकांवरही व्यक्त झाल्या आहेत. कमी-अधिक एक दशक भारतीय जनता पक्षात राहूनही त्यांचे मन रमले नाही. अशात लोकसभा निवडणुकीत भाजपला हवे तसे यश मिळाले नाही. महाराष्ट्रात तर भाजपला घसरण लागल्याचीही चर्चा सुरू झाली. विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतांना सूर्यकांता पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. १९७० च्या दशकापासून सार्वजनिक जिवनात कार्यरत झालेल्या सूर्यकांता पाटील यांची सुरूवात पत्रकारितेपासून(Journalism) होती. पुढे युवक काँग्रेस व काँग्रेस (Congress) पक्षाच्या माध्यमातून काम करत करत त्या नांदेड नगर पालिकेच्या (Nanded Municipal Corporation) सदस्या झाल्या.
१९९८ मध्ये पुन्हा काँग्रेस पक्षाने त्यांना हिंगोली लोकसभेची उमेदवारी दिली
१९८० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्पेâ हदगाव विधानसभेत निवडूण आलेल्या सूर्यकांताताईंना आमदारकी संपताच राज्यसभेची खासदारकी मिळाली. २०९१ पर्यंत काँग्रेसतर्फे राज्यसभेवर राहिलेल्या सूर्यकांताताईंना पक्षाने परत नांदेड लोकसभेची उमेदवारी दिली. १९९८ मध्ये पुन्हा काँग्रेस पक्षाने त्यांना हिंगोली लोकसभेची(Hingoli Lok Sabha) उमेदवारी दिली व त्या तेरा महिन्यांच्या कार्यकाळासाठी खासदार झाल्या. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होताच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. राष्ट्रवादीच्या चिन्हावर १९९९ च्या निवडणुकीत पराभूत होऊनही शरद पवारांनी त्यांना केंद्रशासनाच्या कृषी अनुसंधान परिषदेवर नियुक्त करून राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला. शरद पवारांनी इथेच द्यायचे थांबले नाही तर २००४ च्या निवडणुकीत त्यांच्यासाठी हिंगोलीची जागा काँग्रेसकडून घेऊन त्यांना उमेदवारी दिली. निवडूण आल्यावर त्यांना केंद्रात मंत्रीपद ही दिले.
काँग्रेसने ही जागा परत घेऊन राजीव सातवांना उमेदवारी दिली
यानंतर २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा परत घेऊन राजीव सातवांना उमेदवारी दिली. यावरून सूर्यकांता पाटील यांनी मोठी नाराजी व्यक्त केली; परंतु पक्ष सोडला नव्हता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसतर्पेâ विधान परिषदेवर नियुक्ती मिळेल, अशी त्यांना आशा असतांना रामराव वडकुते यांची नियुक्ती झाली. यानंतर मात्र पक्षावर आगपाखड करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. विधान परिषदेच्या रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असताना भाजप नेत्यांकडून आता नांदेड जिल्ह्याला संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. या पृष्ठभूमिवर सूर्यकांता पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षांतर केले असून त्या राष्ट्रवादीत गेल्या आहेत.