चिखली (Buldhana) :- चिखली तालुक्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजना व रमाई घरकुल आवास योजना अशा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीबांना घरकूल वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये अनेकांनी घरकूल बांधकाम पूर्ण केले तर काही जणांचे घरकूल पैसा अभावी बंद पडले आहेत त्यामुळे गोरगरीब लाभार्भी दररोज घरकुलाचा हप्ता मिळवा यासाठी प. स. ला वारंवार चकरा मारत आहे. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थींना सिंचन विहिरी वाटप करण्यात आल्या होत्या. मात्र त्यामध्यें लाखों रुपयांची घेवाण देवाण झाली अशा संदर्भात माजी आमदार राहूल बोंद्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ४ सप्टेंबर रोजी प. स.वर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
घरकूल व सिंचन विहीर लाभार्थ्यांच्या मागण्या संदर्भात मोर्चा
चिखली पंचायत समिती अंतर्गत १३० च्या वर ग्रामपंचायती आहेत. या ग्रा. प. च्या गावामध्ये गोरगरीब उघड्यावर राहू नये म्हणून त्यांच्या कुंटूबासाठी हक्काचे घर व्हावे यासाठी शासनाने दिड लाख अनुदान देवून घरकूल योजना राबवली जात आहे. एकीकडे शासन प्रत्येकाला हक्काचे घरकुल देण्यासाठी प्रयत्नशील असतांना मात्र घरकूल बांधकाम(Construction) करण्यासाठी दिड लाखाचा निधी कमी पडतो या तुटपुंजी रकमेत गोरगरीबांना घरकूल बांधकाम करण्यासाठीं लागणारे साहित्य विटा, सिमेंट, रेती , गिट्टी, दरवाजे, खिडक्या, मीस्तरी मजूरी आदी खर्च पाहता एकूण चार ते पाच लाखा पर्यत लोकांना पैसे मोजावे लागतात. आणि शासन फक्त दिड लाख रुपये देवून अगोदर काम दाखवा नंतर निधी देतात असे निकष असल्याने अनेक गोरगरीब घरकूल योजने पायी कर्जबाजारी होवून गेला आहे. त्यातच घरकूल बांधकामाचे हप्ते मिळत नसल्याने अनेकांनी व्याजाने अथवा महिलांच्या अंगावरील दागिने विकून घराचे बांधकाम पूर्ण केले तर काही लाभार्थ्यांचे घरकूल बांधकाम पैसा अभावी अपूर्ण अवस्थेत आहे .एकीकडे शासनाने घरकूल लाभार्थ्यांना बांधकामासाठी स्वस्त दरात रेती उपलब्ध करून देवू असे आश्वासन दिले होते.
दरात रेती तर मिळत नाही पण रेती साठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात
परंतु स्वस्त दरात रेती तर मिळत नाही पण रेती साठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. मग जास्तीचे पैसे कोठून आणणार हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे . त्यामुळे अनुदाना अभावी कामाच्या ऐन घाईत घरांचे बांधकाम बंद ठेवण्याची वेळ लाभार्थावर आली आहे. तर काही घरकूल बांधकाम पूर्ण झाल्यामुळे लाभार्थ्यांना पैशासाठी पंचायत समितीला येणे जाणे करावे लागत आहेत. तसेच कशी महिन्यापूर्वी प. स . चे गटविकास अधिकारी यांनी रातोरात सर्व ग्रामसेवकांना आदेश केले की रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थींना सिंचन विहिरीचे(Irrigation wells) वाटप करायचे आहे त्यासाठी अर्ज घेवून या त्यामुळे गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी रविवार दिवस असतांना हजारो रुपयांचां व्यवहार करून अर्ज बिडियो याच्याकडे दिले . या संदर्भात दै देशोन्नती मध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली बातमी या बातमीची माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी तात्काळ दखल घेवून ४ सप्टेंबर रोजी चिखली प. स .वर शेकडो कार्यकर्त्यांसह आक्रोश मोर्चा काढून न.पा .चे सिईओ आणि गटविकास अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरून जाब विचारला या पुढे लाभार्थ्याकडून कोणत्याही प्रकारचां आथिर्क व्यवहार होणार नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले .यावेळी मोठया संख्येने महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .