नागपूर (MLA Dr. Yashwant Bajirao) : नागपूरचे माजी आमदार डॉ. यशवंत नारायण बाजीराव (MLA Dr. Yashwant Bajirao) यांचे दुःखद निधन झाले. हलबांच्या एकतेमुळे ते मध्य नागपूरातून आमदार (Nagpur MLA) म्हणून निवडून आले होते. तसेच ते विदर्भाच्या कबड्डी संघाचे कर्णधार होते. महाविद्यालयाकडून राष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळली होती.
डॉ. यशवंत बाजीराव (MLA Dr. Yashwant Bajirao) यांनी विधानसभा निवडणूक १९९० मध्ये सहा मतांनी विजय मिळविला होता. त्यावेळी डॉ. यशवंत बाजीराव जनता दलामध्ये होते. अखिल भारतीय आदिवासी (All India Tribal) हलबा विकास परिषदेचे संस्थापक डॉ. बाजीराव यांनी न्यू इंग्लिश हायस्कूल आणि (Mohata Science College) मोहता सायन्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. आज महाल येथील झेंडा चौकातून अंत्ययात्रा निघून गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.
डॉ. बाजीराव (MLA Dr. Yashwant Bajirao) यांनी हलबा समाजास संविधानातील असलेले न्याय मिळावे, म्हणून वेळोवेळी हलबा आदिम समाजासाठी आंदोलन केले व मोर्चे काढले. त्यांनी आमदार असताना मुंबईतील चर्चगेटसमोर हलबा समाजास न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण केले होते. युवक काँग्रेसमधून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती.