चंद्रपूर (Chandrapur) :- चंद्रपूर जिल्ह्यात गट काही दिवसापासून गोळीबाराच्या घटनेत वाढ झाली असतानाच शिवसेना ( उबाठा ) गटाचे चंद्रपूर (Chandrapur) युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या इंदिरा नगर येथील घरातून पोलिसांनी 40 काडतूस, एक तलवार, 1 मक्झिन आणि बेसबॉल बॅटसह (baseball bat) , वाघनखे (tiger claws)जप्त केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एक तलवार, 1 मक्झिन आणि बेसबॉल बॅटसह, वाघनखे देखील जप्त
युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्या घरी पोलीस पथकाने संयुक्त कारवाई(joint action) करीत 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे जप्त केली. यासाठी सहारे याच्या घरात 4 तास शोध अभियान राबविण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील गेले काही दिवस गोळीबारांच्या घटनात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र (Firearms) व हत्यार विरोधी विशेष अभियान आरंभले आहे. या अभियानांतर्गत सहारे यांच्याकडे शस्त्रें असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत सहारे याच्या घरावर धाड घातली. सहारे याच्यासह शहराच्या बाबूपेठ भागातील रहिवासी असलेल्या निलेश पराते आणि अमोल कोलतवार नामक 2 विक्रेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. विक्रांत सहारे व कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. स्वतः पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन व वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची माहिती घेतली. एवढ्या मोठ्या संख्येत काडतुसे सापडल्यावर पोलिसांना ही काडतुसे वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या शस्त्राचा माग काढावा लागणार आहे. उबाठा गटाच्या युवा सेना जिल्हाप्रमुख या पदावर असलेल्या विक्रांत सहारे याच्यावरील मोठ्या कारवाईने जिल्ह्यातील दहशतीच्या नेटवर्कविरोधातील नेमका मार्ग पोलिसांना सापडल्याची चर्चा आहे.