परभणी (Parbhani):- शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या नाल्यामध्ये एका पंधरा वर्षीय मुलाचा मृतदेह (dead body) बुधवार २२ मे रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आढळून आला. या प्रकरणी कोतवाली पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीस मयताची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.
रात्री अकरा वाजेपर्यंत मुलाचा शोध
या बाबत बालकिशन दरक यांनी खबर दिली आहे. मंगळवार २१ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी हे नातेवाईकाला घेवून रुग्णालयात (Hospital) गेले असता त्यांच्या जवळ एक मुलगा पळत आला. त्याने सोबत असलेला मुलगा नाल्यात (drain) पडला असल्याचे सांगितले. त्यानंतर खबर देणार व इतरांनी जावून नाल्यामध्ये शोध घेतला, पोलिसांना माहिती दिली. रात्री अकरा वाजेपर्यंत शोध मोहिम राबवुनही मुलगा मिळून आला नाही. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास सदर मुलाचा मृतदेह नाल्यामध्ये आढळून आले.
रेल्वे स्थानकात मिळाला अनोळखीचा मृतदेह
परभणी शहरातील रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर एका अनोळखी ६५ ते ७० वर्षीय इसमाचा मृतदेह बुधवार २२ मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आढळून आला. मयताची ओळख पटलेली नाही. रेल्वे पोलीस पोहेकॉ. मिरासे यांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. पोलीस मृतकाची ओळख पटवत आहेत.
महिलेचा मृतदेह मिळाला
परभणी शहरातील साखला प्लॉट ज्ञानेश्वर नगर येथे एका अनोळखी महिलेचा मृतदेह बुधवारी दुपारच्या सुमारास मिळून आला. महिलेच्या मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या. नेमका महिलेचा मृत्यू कसा झाला, हे मात्र समजु शकले नाही. बुधवारी दिवसभरात दोन अनोळखी मृतदेह आढळून आले आहेत