वर्धा (Wardha) :- देवळी ते वडद आणि पालोती रस्त्यावर अडवून लुटमार करत दहशत पसरविणारे तसेच मालमत्तेविरूद्ध गुन्हे (Crime) करणार्यांचा पोलिसांनी शोध घेत चार जणांना अटक केली. आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आणत मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.
दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना एका बंद घरी चोरीचे घरगुती साहित्य असल्याची माहिती
सालोड मार्गावरील बंद घराचे लॉक व दरवाजा तोडून साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच नागठाणा रोडवरील लोखंडी रेल्वे पुलाजवळ मोटरसायकलने जात असलेल्या व्यक्तीजवळून अज्ञात व्यक्तींनी मोबाईल फोन व पैसे हिसकावले होते. याबाबत तक्रारीवरून सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता. दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना एका बंद घरी चोरीचे घरगुती साहित्य असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे जावून प्रज्वल विनोद ठाकरे (वय २२) रा. सावंगी (मेघे), वर्धा यास ताब्यात घेवून घराची पाहणी केली. घरात गुन्ह्यातील चोरी गेलेले साहित्य मिळून आले.
प्रज्ज्वल ठाकरे यास विचारपूस केली असता, काही दिवसांपूर्वी सावंगी ते सालोड रोडवरील एका बंद घराचे व तेथे जुने लॉक असलेले घराचे दार तोडून तेथून तारासिंग जग्गासिंग बावरी रा. सावंगी (मेघे), संकल्प प्रेमदास शेंदरे रा. तिगाव आमला, आकाश दिलीप ओंकार रा. आमला या तिघांच्या मदतीने मोटरसायकलवर आळीपाळीने चोरून रूमवर आणून ठेवल्याची माहिती पुढे आली. ते साहित्य सावंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले साहित्य असल्याचे निष्पन्न झाले. प्रज्वल ठाकरेच्या झडतीत मोबाईल मिळून आला. हा मोबाईल ठाण्यात दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घतले. आरोपींची सहा दिवसांची पोलिस कोठडी प्राप्त झाली.