अकोला (PM Awas Yojana) : शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awas Yojana) लाभार्थ्यांना अनुदानाचा टप्पा लवकरच मिळणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून तब्बल चार कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील १७ ’डीपीआर’चा समावेश असून, तब्बल ६०० च्यावर लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. सदर अनुदान हे ‘पीएएमएस’ प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे.
याबाबत केंद्र शासनाने तातडीने अनुदान महापालिकेला देऊन त्यांची सुरू असलेली दैनावस्था दूर करण्याची आग्रही मागणी (PM Awas Yojana) प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांमधून होत होती, ती आता काहीअंशी पूर्ण होत आहे. प्रधानमंत्री आवास योजना गेल्या २०१६-२०१७ यावर्षी चालू करण्यात आली आहे. त्याचा मोठा गाजावाजा राज्यभरात करण्यात आला. अकोल्यासारखीच परिस्थिती इतर महापालिका कार्यक्षेत्रात असून, (PM Awas Yojana) प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी त्रस्त असल्याचे गंभीर चित्र आहे.
गेल्या दहा ते अकरा महिन्यांपासून (PM Awas Yojana) प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचे टप्पे मिळाले नाही. त्यामुळे संबंधित प्रभागातील लाभार्थी हे माजी नगरसेवकांच्या घराचे उंबरठे झिजवत आहेत, तर दुसरीकडे माजी नगरसेवक महापालिकेच्या (Municipal Administration) बांधकाम विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु, त्यांच्याकडून आवास योजनेचे अनुदान आज येईल, उद्या येईल असे सांगण्यात येत असताना, चार कोटींचे अनुदान केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे. असे असले तरी प्रत्यक्षात (PM Awas Yojana) प्रधानमंत्री आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांची मोठी दैनावस्था झाल्याचे गंभीर चित्र अकोला शहरात बघावयास मिळत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला टप्पादेखील मिळाला नसून, या योजनेमधून घरांची अर्थात आवासाची निर्मिती कशी करावी, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
लाभार्थ्यांना करावा लागतो रोषाचा सामना
या प्रकाराला महापालिका प्रशासनाचा कारभार जबाबदार नसला तरी केंद्र शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने (Municipal Administration) महापालिका प्रशासनाचीदेखील मोठी गोची होत आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्यांना व माजी नगरसेवकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. परंतु, आता चार कोटींचे अनुदान मंजूर झाल्याने प्रशासनाला, लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
नगरसेवकांचा पाठपुरावा!
शहरामधील प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत (PM Awas Yojana) सुरू असलेल्या घरकुलांचे गेल्या आठ महिन्यांपासून मार्च-एप्रिलपासून घरकुलाचे बिल म्हणजे हप्ते मिळालेले नसून, गोरगरीब जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. परंतु, अनुदान प्राप्त झाल्याने काही प्रमाणात महापालिका कार्यक्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.