परभणी/मानवत (Parbhani):- देशोन्नती (Deshonnati )वृत्तसंकलन तालुक्यातील चार ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरने(Tanker) पाणीपुरवठा करावा या मागणीचे महसूल विभागाकडे(Department of Revenue) प्रस्ताव दाखल केले आहेत. हे प्रस्ताव अद्यापही मंजूर न झाल्याने चार गावांनी २१ मे रोजी प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावे, अशी मागणी केली आहे २४ मे पर्यंत मागणी मान्य न झाल्यास तहसील कार्यालय(Tehsil Office), पंचायत समिती(Panchayat Committee) कार्यालयाच्या परिसरात धरणे आंदोलन करण्याचा इशारा संबंधीत सरपंचांनी दिला आहे
अद्यापही सदरील प्रस्ताव मंजूर झाले नसल्याचे चित्र
मानवत तालुक्यातील हत्तलवाडी, सावळी, सोनूळा व कोल्हा या चार ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचे प्रस्ताव एप्रिलमध्ये दाखल केले आहेत. मात्र अद्यापही सदरील प्रस्ताव मंजूर झाले नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, या संदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना निवेदन दिले आहे. मात्र, ते टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायतींनी केला आहे. गावातील लोकांना पाणी पुरवठ्याची अत्यंत आवश्यकता आहे. २४ मे पर्यंत प्रस्ताव मंजूर करून प्रत्यक्ष टँकरने पाणीपुरवठा सुरू न केल्यास पाणी पुरवठा विभाग(Supply Department), तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांसह धरणे आंदोलन करून कामकाज बंद करण्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर हातलवाडी चे सरपंच तथा युवा सेनेचे तालुकाप्रमुख कृष्णा शिंदे, सावळी चे सरपंच तथा शिवसेनेचे(Shivsena) तालुकाप्रमुख माणिकराव काळे, कोल्हा येथील सरपंच रामचंद्र गायकवाड, सोनुळा येथील सरपंच शाम गिरी, देवलगाव आवचार येथील सरपंच केशवराव आवचार यांच्या सह्या आहेत.