एका कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने हळहळ
वर्धा (Wardha Car Accident) : कारच्या भीषण अपघातात पोलिस कर्मचार्यासह चौघांचा मृत्यू झाला. ७ एप्रिल रोजी वर्धा – समुद्रपूर मार्गावरील तरोडा शिवारात रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडला. रस्त्यावर डुक्कर आडवा आल्याने अनियंत्रित झालेली कार टँकरवर आदळली. या (Wardha Car Accident) भीषण अपघात पोलिस कर्मचार्यासह पती, मुलगा, मुलगी या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
डुक्कर आडवा आल्याने कार अनियंत्रित होऊन घडला अपघात
प्राप्त माहितीनुसार, वडनेर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी प्रशांत मधुकर वैद्य (वय ४३) रा. मांडगाव, ह.मु. वर्धा हे सोमवारी ७ एप्रिल रोजी मांडगाव येथे रामनवमी निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रमासाठी आले होते. महाप्रसाद घेतल्यानंतर ते वर्ध्याला जाण्याकरिता कारने निघाले. (Wardha Car Accident) प्रशांत वैद्य यांची ड्युटी आणि मुलाची परीक्षा असल्याने ते रात्री एमएच ४० केआर ३६०३ क्रमांकाच्या कारने मांडगाव येथून वर्धा येथे जात होते.
दरम्यान, तरोडा गावाच्या पुढे गेले असता कार समोर अचानक डुक्कर आडवे आले. त्यावेळी डुकरास धडक लागून कारवरील नियंत्रण सुटल्याने अयिंत्रीत कार समोरून येणारा टँकर (क्रमांक एमएच०९ सीवी २१८५) ला जाऊन धडकली. या (Wardha Car Accident) भीषण अपघातात प्रशांत वैद्य यांची पत्नी प्रियंका प्रशांत वैद्य (वय ३७) व मुलगा प्रियांश प्रशांत वैद्य (वय ८) यांचा जागीच मृत्यू झाला. प्रशांत मधुकर वैद्य (वय ४३), मुलगी माही प्रशांत वैद्य (वय ३ वर्ष) हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना खाजगी वाहनाने कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी मुलगी माही हिला तपासून मृत घोषित केले.
प्रशांत वैद्य यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. (Wardha Car Accident) दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील चारही सदस्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती जाम महामार्ग पोलिसांना मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सपाटे, भोगे, काकडे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त दोन्ही वाहनाना रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली. (Wardha Car Accident) घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.