वर्धा (Wardha Crime Case) : पोलीस स्टेशनला तक्रार का दिली या कारणावरुन वाद करुन दोघांना जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करणार्या आरोपीतांना ७ वर्ष सक्त मजुरी व २ लाख रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली. हा निर्वळा जिल्हा व सत्र न्यायाधिश- २ एन.बी.शिंदे यांनी दिला. शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आशिक अली शौकत अली (३५), नौशाद शौकत अली संयद (३४) दोन्ही रा. मालगुजारीपुरा वर्धा, आरोपी इमरान उर्फ इम्मु रौफ खॉ पठाण (४४) रा. हनुमान नगर, वर्धा आरोपी सागर अरुणराव झाडे (२६) रा. रामनगर वर्धा अशी आहेत.
आरोपी आशिक अली शौकत अली याने तक्रारदार यांचे मुलास तु माझी पो.स्टे. ला तक्रार का दिली याकारणावरुन (Wardha Crime Case) आरोपी याने मुलगा राहुल खत्री याला पकडुन गळ्याला चाकु लावला. तुझा भाऊ रवी कुठे आहे आज त्याच मर्डर करतो असे म्हणुन राहुल यास हाता भुक्यांने मारहाण करुन त्याचे खिशातील २३०० रुपये घेवुन पळुन गेला.
दि. ६ जुलै २०२१ रोजी आरोपी आशिक अली शौकत अली, नौशाद शौकत अली सैय्यद, इमरान उर्फ इम्पु रौफ खाँ पठाण व सागर अरुणराव झाडे हे सिध्दार्थ नगर येथे तक्रारदार यांच्या मुलाच्या पानठेल्यावर आले. त्यांनी राहुल खत्री व रवी खत्री या दोघांना चाकु, तलवार, गुप्ती या शस्त्राने गंभीर दुखापत करुन त्यांचे पोटातील आतडे बाहेर काढले. तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. (Wardha Crime Case) प्रकरणाचा तपास तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चन्नोर यांनी केला. आरोपीतांनी गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.
सरकारतर्फे अति. सरकारी अभियोक्ता वेदीका पाटील यांनी कामकाज पाहीले. तसेच त्यांना पैरवी अधिकारी देवेन्द्र कडु व राहुल पुरी यांनी साक्षदारांना न्यायालयात हजर केले. शासनातर्फे साक्षीदार तपासण्या आले असुन सरकारी वकीलांचा यशस्वी युक्तीवाद ग्राहय धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ एन.बी. शिंदे यांनी आरोपीस कलम ३०७ भादवि मध्ये ७ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येक ५०, हजार रुपये दंड प्रमाणे २ लाख रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महीने सश्रम कारावास अशी शिक्षा ३१ मे रोजी सुनावली.




