सेनगाव/हिंगोली(Hingoli):- सेनगाव येथे 7 ऑगस्ट रोजीच्या रात्री 11 वाजे दरम्यान शर्टिंग, तोंडाला रुमाल बांधलेला, पायात स्पोर्ट्स शूज घालून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने शहरातील चार दुकाने फोडल्याची घटना घडली आहे सदरील वर्णनाची व्यक्ती ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera)कैद झाली आहे.
घटना सीसीटीव्ही मध्ये कैद सेनगाव येथील घटना
सेनगाव येथे 7 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते 8 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या दरम्यान शर्टिंग करून तोंडाला रुमाल बांधून व पायात स्पोर्ट्स शूज घातलेल्या अज्ञात व्यक्तीने योगेश मेडिकलच्या स्टोअरचे लोखंडी शटर (Iron shutters) चे कुलूप तोडून आत प्रवेश करून गल्ल्यातील नगदी 10 हजार 500 रुपये चोरी करून घेऊन गेला. तसेच साक्षीदार ज्ञानेश्वर सिताराम गांजरे यांच्या गांजरे मेडिकल स्टोअर्स चे शटर चे कुलूप तोडून आत प्रवेश करून गल्ल्यातील नगदी 8 हजार 200 रुपये, तसेच विजयकुमार दिगंबर शिंदे यांच्या शिवराज ट्रेडर्सचे शटर चे कुलूप तोडून आत प्रवेश करून गल्ल्यातील नगदी 300 रुपये, त्याचप्रमाणे सुरज कानवडे यांची पानपट्टीचे कुलूप तोडून आत प्रवेश करून नगदी दोन हजार रुपये असे एकूण 21 हजार रुपये चोरून घेऊन गेला अशी फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी सेनगाव पोलिसात अशोक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.