फुलकळस (Parbhani):- पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथे लागलेल्या आगीत चार हजार कडबा, शेती साहित्य जळून खाक झाले. ही घटना बुधवार २२ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. आगीमध्ये शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील घटना; सुदैवाने जीवितहानी नाही
फुलकळस येथील शेतकरी वैजनाथ शिराळे, गंगाधर शिराळे यांची गट क्रमांक ३६७ मध्ये शेती आहे. शेतातील आखाड्यावर त्यांनी पशुधनासाठी(livestock) आवश्यक असलेला चारा गंजी करुन ठेवला होता. बुधवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत(fire) शेतातील कडबा, ठिबक सिंचन व इतर साहित्य जळाले. घटनेची माहिती ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि. कपिल शेळके यांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वार्याने आग वाढून मोठे नुकसान (damage) झाले आहे. शेतकर्यास मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
भंगाराच्या दुकानाने घेतला पेट
शहरातील नेहरु पार्क जवळ काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणातील एका भंगारच्या दुकानाने बुधवार २२ मे रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास पेट घेतला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी(loss of life) झाली नाही. शहर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आग अटोक्यात आणली.