वसमत(Hingoli):- वसमत तालुक्यातील खांडेगाव पाटीजवळ रविवारी सायंकाळी रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने एकापाठोपात एक तीन वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात (Accident) तीन वाहनांना नुकसान झाले आहे. धडक देणाऱ्या टिप्परचेही नुकसान झाले आहे. या धडकेत 2 जन जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना नांदेडला पाठवण्यात आले असून या अपघातात एक म्हैसही जखमी झाली आहे. या विचित्र अपघात प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार देण्यास कोणी आले नसल्यामुळे पोलीस तक्रारदाराची वाट पाहत आहेत.
दोघा जखमींना नांदेडला पाठवले
रविवारी सायंकाळी खांडेगाव पाटीजवळ सुसाट वेगाने धावणाऱ्या टिप्पर(Tipper) क्रमांक एम एच 12 एफ सी 75 63 ने म्हशीची वाहतूक करणाऱ्या एम एच 38 इ 22 92 या पिकअपला धडक दिली यात पिकप चे नुकसान झाले. पिकअप मध्ये असलेली म्हैस जखमी झाली आहे. या धडकेनंतर टिप्पर थांबला नाही तर या टिप्परने 407 टेम्पो क्रमांक एम एच इ 328 ला धडक दिली व त्यानंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या मोटरसायकल क्र एम एच 38 एस 89 80 लाही धडक दिल्याने एकापाठोपाठ एक तीन वाहनांना धडक देऊन हा टिप्पर रस्त्याच्या बाजूला विजेच्या खांबाजवळ जाऊन आदळला चाक रुतल्याने थांबला. या अपघातात टिप्परचेही नुकसान झाले आहे व धडक दिलेल्या तीन वाहनांचे नुकसान झाले आहे.
टिप्पर रस्त्याच्या बाजूला विजेच्या खांबाजवळ जाऊन आदळला
भरधाव वेगाने धावून अपघात करणाऱ्या या टिप्परच्या धुमाकुळामुळे महामार्गावर काही वेळ भीतीचे वातावरण होते
या अपघातात भुजंग केशवराव कदम राहणार कोर्टा तालुका वसमत, दत्ता बालाजी कदम राहणार मरळक तालुका नांदेड हे दोघे जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले अपघाताचे वृत्त समजतात वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजय उपरे, अविनाश गायकवाड यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जखमींना दवाखान्यात हलवण्यात आले नांदेड येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत अद्याप या प्रकरणी तक्रार देण्यास देण्यात आलेली नाही गुन्हा नोंदवल्यानंतरच राष्ट्रीय महामार्गावरून दिवसाढवळ्या एवढ्या प्रचंड वेगाने टिप्पर का धावत होता.? रेतीची वाहतूक होत होती का.? एका मागोमाग एक अपघात चालकाने कसे केले.? याचा शोध लागणार आहे. या विचित्र अपघाताची तालुक्यात चर्चा होत आहे