पुसद (Yawatmal):- पुसद वरून खंडाळा कडे चार चाकी क्रमांक एमएच. 12.एचएन 9345 या वाहनाचा चालक मृतक आकाश नेमिचंद जाधव रा. मुंबई हल्ली मुक्काम श्रीरामपूर वय 33 वर्ष याने अत्यंत निष्काळजीपणे व भरधाव वेगाने आपल्या ताब्यातील वाहन चालवून भीषण अपघात (terrible accident) घडून आणला सदर घटना दि. 23 ऑगस्ट च्या मध्यरात्री साडेबारा ते एक वाजता दरम्यान हा भीषण अपघात घडला.
दोन जागेवरच मृत तर चार जण गंभीर जखमी
या दुर्दैवी घटनेमध्ये वाहनाचा चालक-मालक मृतक आकाश नेहमीचंद जाधव व ऋषिकेश टाले हे दोघेजण जागीच ठार झाले. असलेले इतर चार जण अत्यंत गंभीर जखमी झाले. यामध्ये अभय पांडुरंग पाईकराव यांच्यावर येथील मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर इतर तीन जणांना नांदेड येथील रुग्णालयात (Hospital)रेफर करण्यात आले आहे. ऋषिकेश प्रभाकर टाले वय 21 वर्ष रा.मधुकर नगर, हे दोन मृतक, तर गंभीर जखमी आदित्य दीपक धर्माधिकारी वय २० वर्ष रा. श्रीरामपूर, विजय रमेश पोटे वय 22 वर्ष रा.सुदर्शन नगर, तुषार सुभाष आडे वय 20 वर्ष रा. श्रीरामपूर व अभय पांडुरंग पाईकराव वय 22 वर्ष रा. मधुकर नगर याप्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात आरोपी वाहनाचा चालक मृतक आकाश नेमीचंद जाधव याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कायद्यान्वये कलम 106(2), 281, 125(अ.ब.), अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सतीश जाधव यांच्या सूचनेनुसार एएसआय शिवाजी देशमुख, हेड पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण इत्यादी करीत आहेत.