फसवणूक झाली असल्यास संबंधितानी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करण्याचे जे एस डब्ल्यू कंपनी प्रशासनाचे आवाहन
कळमेश्वर (JSW company) : सध्या नागपूर जिल्ह्यात रेल्वेसह शासकीय निमशासकीय विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांकडून पैसे उकळून लूटमार करणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली असून असाच एक प्रकार कळमेश्वर औद्योगिक वसाहतीतील (JSW company) जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट लिमिटेड या कंपनीमध्ये उघडकीस आला आहे. गुड्डू कुमार गणेश नगर हनुमान मंदिर दिल्ली, संदेश भास्कर कोरे, असे फसवणूक झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार कळमेश्वर औद्योगिक वसाहतीमध्ये जे एस डब्ल्यू लिमिटेड या नावाने मोठी कंपनी आहे.
या (JSW company) कंपनीमध्ये स्टील रोल उत्पादन घेतले जाते कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून प्रशासकीय कार्यालय कळमेश्वर औद्योगिक वसाहतीत कंपनी परिसरामध्ये आहे मोठी कंपनी असल्याकारणाने या कंपनीमध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंते तांत्रिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी नोकरी मिळवण्याकरिता इच्छुक असतात त्याच संधीचा फायदा घेऊन जिल्ह्यात राज्यात आणि देशात एक टोळी सक्रिय झाली असून जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट मध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगून अशा सुशिक्षित बेरोजगारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना बनावट नियुक्तीपत्र देत फसवणूक करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे.
गुड्डू कुमार गणेश नगर हनुमान मंदिर जवळ दिल्ली, संदेश भास्कर कोरे असे फसवणूक झालेल्या युवकांचे नाव आहे सदर दोन्ही युवक नोकरी मिळवण्यासाठी बनावट ऑफर लेटर घेऊन कळमेश्वर औद्योगिक वसाहतीतील जेएसडब्ल्यू च्या प्रशासकीय कार्यालयात आले असता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते ऑफर लेटर पाहताच बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले अधिकाऱ्यांनी सदर नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सांगताच दोन्ही तरुणांच्या पायाखालची जमीन सरकली दोन्ही तरुणांनी या नोकरीसाठी आपण पैसे दिल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत त्यांना पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला.
या बनावट नियुक्ती पत्रावर जेएसडब्ल्यू सेंटर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा मुंबई (JSW company) असा पत्ता देण्यात आलेला असून गुड्डू कुमार यास 9 सप्टेंबर रोजी कार्यालयात हजर राहून नोकरी जॉईन करावी असे नियुक्ती पत्रही देण्यात आलेले आहे या पत्रामध्ये 4लक्ष 50 हजार रुपयाचे पॅकेज देण्यात आलेले असून शालेय शिक्षणातील तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील मूळ कागदपत्रे सादर करण्यासही सांगण्यात आलेले आहे या पत्रामध्ये शेवटी सीनियर एच आर मॅनेजर म्हणून शाश्वत कौशिक यांच्या नावाची बोगस सही सुद्धा करण्यात आलेली आहे तर संदेश कोरे या युवकाच्या नियुक्ती पत्रामध्ये 18 जुलै 2024 रोजी कंपनी जॉईन करण्याबाबत पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे दोन्ही युवकांची लाखोंची फसवणूक झाल्याची माहिती जे एस डब्ल्यू स्टील कोटेड प्रशासनाचे अधिकारी दिलीप गजभिये यांनी दिली.
जेएसडब्ल्यू स्टील कोटेड कंपनीमध्ये नोकरीच्या आमिषाला कोणीही बळी पडू नये कंपनी प्रशासनाचे आवाहन
जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट लिमिटेड (JSW company) या कंपनीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बोगस नियुक्त पत्र देण्याचा प्रकार उघडकीस आला असून जेएसडब्ल्यू कंपनीच्या नावावर सुशिक्षित बेरोजगार युवकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली जात आहे बोगस संस्था अशा नियुक्तीपत्र जारी करून कंपनीच्या नावाचा गैरफायदा घेत आहेत जेडब्ल्यू कंपनी प्रशासन कुठलीही भरती करताना पारदर्शकता ठेवत असून रोजगार भरती प्रक्रिया प्रशासकीय चॅनलच्या माध्यमातून राबविली जाते कुठल्याही खाजगी इस्माकडे भरती प्रक्रियेत बाबत जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासन जबाबदारी सोपवत नसून अशा बोगस नियुक्तीपत्र देणाऱ्या संस्था तसेच खाजगी व्यक्तीकडून युवकांनी सावधगिरी बाळगावी.
तसेच जेएसडब्ल्यूच्या (JSW company) नावावर नोकरी लावून देण्याबाबत कोणताही आर्थिक व्यवहार कुणाशीही करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून असा प्रकार कोणासोबत घडल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी अशा व्यक्तीसोबत कुठलाही संबंध ठेवू नये तसेच कुणा सोबत ही कंपनीच्या नावावर पैशाचा व्यवहार करू नये असा प्रकार कोणासोबत घडल्यास त्यांनी जेएसडब्ल्यू प्रशासनासोबत संपर्क साधून सावधानता बाळगावी, असे आवाहन (JSW company) जेएसडब्ल्यू प्रशासनाकडून करण्यात आले आहे.