फसवणुकीचा गुन्हा दाखल, प्रकरणातील आरोपी फरार
अकोला (Crypto Currency) : खदान पोलिस स्टेशन हद्दीतील विद्युत कॉलनी, रिंग रोड येथे अॅडव्हाइस अलायन्स या कंपनीचे कार्यालय थाटून ’क्रिप्टो करन्सी’च्या (Crypto Currency) नावावर पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष देत चार आरोपींनी सुमारे चार ते साडेचार कोटी रुपयांनी फसवणूक केली. या फसवणूक प्रकरणातील (Khadan Police Station) आरोपी फरार असल्याने माजी सैनिकांच्या पत्नीसह इतरांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडे धाव घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे.
अॅडव्हाइस अलायन्स कंपनीत गुंतविले कोट्यवधी रुपये
सुरेखा गौतम ओवे (३८) रा. गोकूळ कॉलनी, पोदार शाळेजवळ यांनी खदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यामध्ये त्यांनी आरोपी नागेश अरुण वाहुरवाघ (५२), सोनाली नागेश वाहुरवाघ (४५) रा. खडकी धाबेकर नगर, अॅडव्हाइस कंपनीचे सीईओ गौरव प्रभाकर अंबुसकर (२७) रा. पिल कॉलनी, निवारा कॉलनी दोन मलकापूर व कंपनीचा एमडी उमेशकुमार बाबाराव निखाडे (४५) रा. सागर कॉलनी, बायपास या चौघांनी संगनमत करून अलायन्स कंपनीच्या नावावर पैसे दामदुप्पट करून प्रलोभन दिले. त्यानुसार तक्रारदार ओवे यांनी ४ कोटी ४६ लाख ९९ हजार रूपये आरोपींना दिले.
या (Crypto Currency) फसवणूक प्रकरणातील आरोपी नागेश वाहुरवाघ व सोनाली वाहुरवाघ हे दोघेही ओवे यांचे नातेवाईक आहेत. आरोपींना त्यांच्याकडे पैसे असल्याची माहिती होती. त्यामुळे पैसे दामदुप्पट व मोठमोठे स्वप्न दाखवून आरोपींच्या आमिषाला तक्रारदार महिला ओवे बळी पडल्या. आरोपींनी त्यांच्याकडून सुमारे चार ते साडेचार कोटी रूपये उकळून त्यांना गंडविले, असा आरोप तक्रारीतून केला आहे. याप्रकरणी (Khadan Police Station) खदान पोलिस स्टेशनमध्ये ओवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूध्द भारतीय दंड संहिता कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
‘क्रिप्टो करन्सी’च्या नावावर ६० जणांची फसवणूक!
या प्रकरणातील आरोपींनी संगनमत करून एक दोन नव्हे तर सुमारे ६० जणांची (Crypto Currency) ‘क्रिप्टो करन्सी’च्या नावावर पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष देत फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यांपैकी १५ ते २० जणांनी पोलिसांकडे लेखी बयाण दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना पोलिस कधी अटक करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
म्हणे, आम्ही कंपनीचे पार्टनर!
आरोपी वाहुरवाघ यांनी तक्रारदार महिला यांना सदर कंपनीचे पार्टनर असल्याची बतावणी करून प्लॉटिंगच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. तसेच हॉटेलचासुध्दा व्यवसाय असल्याचे तक्रारदार महिलेला सांगण्यात आले. त्यावर आरोपी वाहुरवाघ याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ओवे यांनी सुमारे अॅडव्हाइस अलायन्स कंपनीत सुमारे चार ते साडेचार कोटी रूपये गुंतविले. परंतु, पैसे दामदुप्पट करून देण्याचे सोडा, उलट आरोपींनी त्यांचा विश्वासघात करून गंडा घातल्याची बाब समोर आली.
आरोपींना अशाप्रकारे दिल्या रकमा!
आरटीजीएसद्वारे एक लाख रूपये, दहा लाख रूपये, रोख रक्कम पाच लाख रूपये, फोन पे द्वारे ९९ हजार ९९९ रूपये पाठविण्यात आली. त्यानंतर ७० हजार रूपये दिले. तसेच आरटीजीएसद्वारे तीन लाख रूपये, पाच लाख रूपये पाठविण्यात आले. याशिवाय शंभर रूपयांचा बॉन्डवर करारनामा करून गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट देऊन परतावा देण्यासाठी खोटा बनाव केल्याचे उजेडात आले आहे.
नातेवाईक व मित्रानेच घातला गंडा!
या (Crypto Currency) फसवणूक प्रकरणातील आरोपी नागेश वाहुरवाघ व वाहुरवाघ हे दोघेही तक्रारदार महिलेचे नातेवाईक आहेत. तर उमेशकुमार निखाडे त्यांच्या पतीचा मित्र आहे. सदर प्रकरणात नातेवाईक व मित्रानेच सुमारे चार ते साडेचार कोटी रूपयांनी फसवणूक केल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
फसवणूक प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे!
या (Crypto Currency) प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षकांनी सदर फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत असून, त्यांच्या तपासाकडे फसवणूक झालेल्यांचे लक्ष लागले आहे.