परभणी/जिंतूर(Parbhani) :- गुंतवणुकदारांना अधिक व्याजाचे अमिष दाखवत रक्कम परत न देता ८ कोटी २४ लाख २६ हजार ७८० रुपयांची फसवणूक (Fraud)करण्यात आली. १११ गुंतवणुकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट चे संचालक आणि कर्मचारी मिळून एकूण २० जणांवर ६ ऑगस्ट रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यानंतर आता जिंतूर पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
जिंतूर पोलीस ठाण्यात २० आरोपींवर गुन्हा दाखल
पंडित रामभाऊ बुधवंत यांनी फिर्याद दिली आहे. १२ ऑक्टोबर २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधी दरम्यान ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये फसवणूक झाली. संबंधित पतसंस्थेचे संचालक आणि कर्मचार्यांनी अधिक व्याजाचे अमिष दाखवत गुंतवणूक(investment) करुन घेतली. गुंतवणुकदारांची मुद्दल आणि व्याज मिळून ८ कोटी २४ लाख २६ हजार ७८० रुपयांची रक्कम न देता फसवणूक केली. १११ गुंतवणुकदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार जिंतूर येथील शाखेत घडला.
या प्रकरणी बिभीषण खेत्रे, खुरपे, सचिन काटकर, गणेश पिंपरकर, नारायण शिंदे, सुरेश कुटे, अर्चना कुटे, यशवंत कुलकर्णी, वसंत सटाळे, अशिष पाटोदेकर, दादाराव उंदरे, वैभव कुलकर्णी, वैâलास मोहिते, शिवाजी पारसकर, रविंद्र तलवे, सौ. आशा पाटील, रेखा सटाळे, रघुनाथ खरसाडे, रविंद्र यादव, प्रल्हाद काळे यांच्यावर जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर सदर संस्थेवर परभणी येथील कोतवाली पोलिसात ही गुन्ह्याची नोंद झालेली आहे.