कन्हान (Free Eye Checkup Camp) : जनता मेडिकल स्टोअर्स आणि (Madhav Netralaya) माधव नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हान शहरात आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात १४५ लोकांची नेत्र तपासणी आणि मार्गदर्शन करून निशुल्क चष्मे वाटप करण्यात आले.
सोमवार (दि.६) ला कन्हान शहरात आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अविनाश अग्निहोत्री यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्याम पिपळवा, पी.के. तुरकर, शिवा कुकडे, ए.आर. शहा, दिनेश ढोके, पानतावणे, प्रमोद वंजारी, साकेत चौहान, कुशल डायरे, आंचल सिंग आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला आणि तज्ञ डॉक्टरांनी १४५ लोकां ची मोफत नेत्रतपासणी करून योग्य मार्गदर्शन करून निशुल्क चष्मे वाटप करण्यात आले.
समाजात डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणे आणि (Free Eye Checkup Camp) डोळ्यांचे आजार लवकर ओळखणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. शिबिरात बहु संख्येने नागरिकांनी उपस्थित राहुन संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी जनता मेडिकल स्टोअर्स आणि माधव नेत्रालय (Madhav Netralaya) यांनी भविष्यात अशी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प केला.