बुलडाणा (free fire) : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जालिंदर बुधवत यांच्या (Shivshakti Urban bank) शिवशक्ती अर्बन क्रेडिट सोसायटी शाखा मासरूळ येथे आज रात्री आठ वाजेच्या सुमारास विद्युत पुरवठा शॉर्टसर्किट होऊन (bank fire) भीषण आग लागली आजूबाजूला बँकेसमोर सुद्धा गावकरी बसलेले होते आतून फाटफट आवाज आला त्यावेळेस आजूबाजूच्या नागरिकांनी तेथून बाजूला होऊन बँक कर्मचाऱ्यांना फोन लावले, तोपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केले होते.
कागदपत्र जळून खाक
गावातील नागरिकांनी समोरच गल्लीत पाण्याच्या टाक्या भरल्या असल्यामुळे बकेट ने पाणी फेकले व आग विझवली त्याआगीत सोसायटीमधील कॅम्पुटर फर्निचर काही कागदपत्र जळून खाक (bank fire) झाले. कृष्णा जालिंदर बुधवत यांना दूरध्वनी वरून कळविण्यात आले त्यांनी सुद्धा तात्काळ येऊन पाणी केली.