सुशीलाई हॉस्पिटल यांची सेवा शेकडो महिलांनी घेतला शिबिराचा लाभ
पातूर (Free Health camp) : पातूर तालुक्यातील डोंगरी भागात येत असलेले शेकापूर, रामनगर, खापरखेड येथे सुशीलाई हॉस्पिटल अकोला, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शेकापूर येथील ग्रामपंचायत येथे महिलांचे (Free Health camp) मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या प्रसंगी शिबिराचे उदघाटन शेकापूर येथील सरपंच सौ सरिता संदिप पवार तसेच डॉ महेश गजाननराव देशमुख यांच्या हस्ते झाले. ग्रामीण भागात जनजागृती व्हावी व स्त्रियांनी आरोग्याची घ्यावयाची काळजी व उपचार यामध्ये प्रसूती सेवा,गर्भपिशवीचे उपचार व शस्त्रक्रिया, अंडाशय व गर्भनलिका शस्त्रक्रिया,कॅन्सर निदान, रजोनिवृत्ती सल्ला,मेमोग्राफी,वंध्यत्व निवारण याविषयी योग्य मार्गदर्शन सुशिलाई हॉस्पिटल अकोला चे संचालक डॉ. महेश देशमुख व डॉ सौ यशश्री म देशमुख यांनी केले.
यावेळी रुग्णसेवक संघटनेचे मंगेश केणेकर, रक्षण देशमुख उपस्थित होते.शिबिरात आलेल्या महिलांची (Free Health camp) मोफत आरोग्य तपासणी तसेच औषध वितरण करण्यात आले. तसेच शेकापूर, रामनगर, खापरखेड येथील शेकडो महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.यावेळी शेकापूर येथील सरपंच पती संदिप पवार, उपसरपंच अनिता राठोड,संदिप राठोड,बोदिराम राठोड, सुभाष राठोड, निसार अली, अविनाश राठोड, योगेश राठोड, किरण राठोड, अमोल राठोड, अंकुश चव्हाण, आशा सेविका मंगला पवार, अंगणवाडी सेविका उज्वला राठोड,ICRP बचत गटाच्या जोत्स्ना समाधान चव्हाण डॉक्टर स्टाफ सुखलाल सुलताने सोनाली वाघमारे, शुभम वायकर, भारती इंगोले, रोहन देशमुख, सागर वकटे आदींचे शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले.
प्रतिक्रिया
डॉक्टर साहेबांनी आमच्या डोंगरी भागात येऊन आम्हाला सेवा दिली रुग्णांचे समाधान केले योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे महिलामध्ये आरोग्या विषयी जनजागृती निर्माण झाली.व महिलातील मनातील आजाराविषयी असणारी भीती निघून आली.
– सरिता संदिप पवार, सरपंच शेकापूर