कनेरगाव नाका/हिंगोली (Kanergaon Naka police) : मराठवाडा -विदर्भाच्या सिमेवरील कनेरगाव नाका पोलिस चौकी (Kanergaon Naka police) आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी अद्यापही देण्यात आले नाही. आज परिस्थितीमध्ये पोलिस चौकीत सर्रास वराहाचा वावर होत आहे.
जिल्ह्यातील मराठवाडा -विदर्भाच्या सीमेवर असलेल्या कनेरगाव नाका येथे निजाम कालीन इमारतीमध्ये फार जुनी पोलीस चौकी गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत होती त्यावेळेस या ठिकाणी एक पोलीस उपनिरीक्षक व पाच पोलीस कर्मचारी या चौकी अंतर्गत येत असलेल्या गावांची व परिसराची देखरेख करीत होते; परंतु १५ ऑगस्ट २०२४ पासूनही पोलिस चौकी वरिष्ठ स्तरामधून आदेशानुसार बासंबा पोलिस स्टेशनला जोडण्यात आली तेव्हापासून या पोलिस स्टेशनला कायमस्वरूपी कर्मचारी अद्यापही देण्यात आलेले नाहीत. येथील पोलिस चौकी बासंबा पोलिस स्टेशनंतर्गत असल्यामुळे व कर्मचारी नसल्यामुळे (Kanergaon Naka police) कनेरगाव नाका येथे मागील महिन्यात एक धाडसी चोरी देखील या ठिकाणी झाली या चोरीचा अजून देखील तपास झालेला नाही याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी कोणीही कर्मचारी नसल्याने हा तपास आजपर्यंत लागलेला नाही या चौकीमध्ये फक्त होमगार्ड यांच्या व्यतिरिक्त पोलिस कर्मचारी दिसत नाहीत.
कनेरगाव नाका (Kanergaon Naka police) येथील पोलिस चौकी गोरेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत सुरु असतांना या ठिकाणी अवैध धंदे बंद होते; परंतु ही पोलिस चौकी बासंबा पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू होताच या ठिकाणी अवैध धंद्याना ऊत आला आहे. यामध्ये मटका , जुगार हे खुले आम सुरु झाले आहेत. हे अवैध धंदे मुख्य रस्त्यावर बस स्टँडवर तसेच शाळेच्या बाजूला खुले आम सुरू असून वरिष्ठ याकडे याकडे लक्ष देत नाहीत कनेरगाव नाका पोलिस चौकीवर वरिष्ठांचे दुर्लक्ष का झाले हे सुद्धा येथील नागरिकांना न समजणारे कोडे पडले आहे. येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या चौकीमध्ये पोलिस कर्मचारी हजर राहत नसल्याने या चौकीमध्ये वराह मुक्त संचार करीत आहेत तर मोकाट कुत्र्यांचा या ठिकाणी विसावा असलेला दिसत आहे. तसेच (Kanergaon Naka police) चौकीमध्ये साफ सफाई नसल्याने सर्वत्र घान दिसुन येत आहे . हिंगोली जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे बासंबा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कनेरगाव नाका पोलिस चौकीकडे लक्ष देतील काय असे जनसामान्य जनतेत चर्चेचा विषय बनला आहे.