पंतप्रधान मोदींकडून प्रतापराव जाधवांचा मैत्रीपूर्ण उल्लेख!
बुलढाणा (Prataprao Jadhav ) : अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day), भारताचा मुख्य राष्ट्रीय सोहळा आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणमच्या सागरकिनारी भव्य-दिव्य प्रमाणात पार पडला. या कार्यक्रमाच्या आयोजनात केंद्रीय आयुष मंत्रालयाची महत्त्वाची भूमिका होती. या यशस्वी भूमिकेबद्दल कौतुक करताना (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी.. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचा “मेरे परममित्र, कॅबिनेट के मेरे सहयोगी..” असा मैत्रीपूर्ण उल्लेख केला.
विशाखापट्टणम येथे (International Yoga Day) आंतरराष्ट्रीय योगदिनी म्हणजे शनिवार २१ जून रोजी, योग दिनाच्या मुख्य राष्ट्रीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय आयुषमंत्री ना. प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी, आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदिन सुरू करण्याचे काम (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये केले असून भारताचा युग आज विश्वयोग बनल्याचे सांगत.. या योग दिनामागची भूमिका विषद केली. त्यानंतर तब्बल ५ लाख योगसाधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. एवढी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी ना. प्रतापराव जाधव यांचा उल्लेख “मेरे परममित्र, कॅबिनेट के मेरे सहयोगी प्रतापरावजी जाधव..” अशाप्रकारे केला.
पंतप्रधान मोदींनी (PM Modi) केलेला हा प्रतापरावांचा उल्लेख, ना. जाधव (Prataprao Jadhav) समर्थकांसह शिवसेनेसाठी महत्त्वपूर्ण ठरत असून ही क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.