रेणापूर (Latur):- मराठवाड्यातील प्रति पंढरपूर म्हणुन ओळख आसलेले रेणापुर तालुक्यातील पानगांव येथील हेमाडपंथी विठठल रुक्मीनी मंदीर (Vitthal Rukmini Temple)असून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त परिसरातील विठ्ठलभक्त वेगवेगळ्या दिंड्याच्या माध्यमातुन पांडुरंगाचे गजर करित पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्या. ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य झाले नाही, असे हजारों वारकरी वैष्णवांनी पानगावात गर्दी केली होती.
आषाढी एकादशीनिमित्त पानगांवात भरला हजारो वैष्णवांचा मेळा
माजी आ.बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते पहाटे पाच वाजता विठ्ठल- रुक्मिणीची मनोभावे महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी पानगाव आणि परिसरातून येणाऱ्यां भाविकांची गर्दी पाहता मंदिर समिती कडून शेजारील वीस बावीस गावच्या दिंड्या येत असल्याने त्यांचे दिंडी पूजन, सत्कार, पावले खेळण्यासाठीची जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच या यात्रेनिमित्त लागणारी दुकानांची जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. दिंडी वाल्यांची दर्शनासाठीची वेगळी व्यवस्था केली आहे. दोन दिवसांपासुन सारखा पाऊस असल्याने दर्शन रांगेवर सुद्धा वॉटरप्रूफ मंडप (Waterproof tent) लावला आहे. दिवसभर फराळ व्यवस्था केली असून पानगाव येथील टॅक्सी संघटना (Taxi Association)अनेक वर्षांनी मंदिर समिती सोबत या फळ्याची व्यवस्था करत आहेत. मंदिरामध्ये फुलाचे डेकोरेशन (Flower decoration) तसेच मंदिरावर लाइटिंग व्यवस्था, पाणी व्यवस्था करून ठेवली होती. सरूबाई हरीभाऊ कस्तुरे चॅरीटेबल ट्रस्ट पानगांव, गजानन मेडीकल येणाऱ्या भाविक भक्तांची मोफत आरोग्य तपासणी (Health Check) व आणि माऊली ब्लड बॅक लातुर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले होते. दिवसभर पांडूरंगाच्या दर्शनाकरिता हजारों भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. मंदीर समिती आणि गांवकरी मंडळीनी भक्तांची कसलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली.