परभणी (Parbhani):- आधार अपडेट इन युवर युनियन बँक अकाउंट, अशा अशयाचा संदेश मोबाईलवर (Mobile टाकत एकाचा मोबाईल हॅक करुन संबंधिताच्या युनियन बँक ऑफ इंडिया शाखेतील खात्यामधून ४ लाख ९९ हजार ५०० रुपये इतकी रक्कम परस्पर ऑनलाईन (Online) पध्दतीने काढत फसवणूक करण्यात आली. ही घटना १० ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास परसावत नगर भागात घडली. या प्रकरणी चौकशी नंतर २४ सप्टेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कोतवाली पोलिसात गुन्हा
ऋषिकेश फुलपगार यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरुन संदेश आला. संबंधिताने आधार अपडेट असा संदेश टाकत फिर्यादीच्या खात्यातून ऑनलाईन पध्दतीने परस्पर रक्कम काढून पश्चिम बंगाल येथील कोलकत्ता या ठिकाणच्या एका बँक (Bank)शाखेतील एका खात्यात वळती करुन घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ऋषिकेश फुलपगार यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठत अज्ञात मोबाईलधारकाविरुध्द तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.