बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचे कनिष्ठ सुपुत्र चि.पृथ्वीराज याचा विवाह लोणार येथील राजेश मापारी यांची सुकन्या चि.सौ.का. डॉ. वसुंधरा हिचेशी आज बुधवार 29 मे रोजी, बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी प्रांगणावर वैदिक पद्धतीने संपन्न झाल्यावर महाराष्ट्र राज्याचे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी नवदांपत्यांना शुभाशिर्वाद दिले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री महोदय तेवढ्यासाठी खास हेलिकॉप्टरने दुपारी दोन वाजता बुलढाणा येथे आले होते. याच दिवशी आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचाही वाढदिवस असल्याने त्यांची अभिष्टचिंतन पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांनी केले, अन् नवदांपत्यासह गायकवाड परिवारासोबत ना. एकनाथ शिंदे यांनी एकाच टेबलवर स्नेहभोजनही केले.
ना. एकनाथ शिंदेंकडून आ. संजय गायकवाड यांचेही अभिष्टचिंतन !
धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड (Sanjay Gaikwad) व माजी नगराध्यक्ष सौ. पूजाताई गायकवाड यांचे सुपुत्र पृथ्वीराज याचा विवाह संजूभाऊ यांच्याच वाढदिवशी म्हणजे आज 29 मे रोजी सकाळी वैदिक पद्धतीने संपन्न झाला तर सायंकाळी पारंपरिक पद्धतीने तो साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी खास उपस्थिती लावली, यावेळी हेलीपॅडवर आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी त्यांचे आधी स्वागत केले. नंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा थेट वैदिक विवाहस्थळी पोहोचला. त्यांनी पृथ्वीराज-वसुंधरा खास शुभाशिर्वाद देत, वाढदिवस असल्यामुळे संजूभाऊंचेही अभिष्टचिंतन केले.
याआधी राज्याचे मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही हजेरी लावून नव दाम्पत्यांना शुभाशिर्वाद देत संजूभाऊंचेही वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय रायमुलकर, शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर नेते प्रामुख्याने उपस्थित होते. सायंकाळी पारंपरिक पद्धतीने भरगच्च उपस्थितीत हा विवाह सोहळा एस.टी. वर्कशॉपच्या मागील भव्य दिव्य मैदानात संपन्न होत आहे.