परभणी (Parbhani) :- बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे शिक्षण घेणाऱ्या एका पाच वर्षीय चिमुरडी वर त्या शाळेतील शिक्षकाने अत्याचार (torture) केल्या प्रकरणी आज रोजी बीड जिल्ह्यातील माजलगाव बंद चव्हाण करण्यात आले होते.
सोनार समाज बांधवाकडून शहरातील शिवाजी चौकातून पायी मूक मोर्चा
आज परभणी शहरातील सर्व सोनार समाज बांधवाकडून शहरातील शिवाजी चौकातून पायी मूक मोर्चा परभणी जिल्हाधिकारी कार्यालय पर्यत शांतपणे काढण्यात आला व जिल्हाधिकारी यांना परभणी विधानसभेचे(Parbhani Assembly) आमदार डॉक्टर राहुल पाटील व सर्व सोनार समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात प्रमुख मागणी अशी करण्यात आली. अत्याचार करणारा नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात
यावी व सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशा प्रमुख मागण्याची निवेदन परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात सोनार समाज बांधव उपस्थित होते.