चिखली (Buldhana) :- गेल्या काही महिन्या पासून आमखेड ग्रा.प. चे सरपंच व सचिव यांच्यात अंतर्गत वाद विवाद सुरू असल्याने सरपंच पती पत्नी यांनी तक्रार (complaint) करुण ग्रामसेविकेची बदलीचा आदेश मिळविला. याची भनक सदस्यांना लागताच बदली रद्द करण्यासाठी सरपंच व सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू होवून राजकीय पक्षांच्या नेत्यांना पुढे प्रतिष्ठा पणाला लावली जात आहे .
आमखेड ग्रा. प . मध्ये राजकारण तापले
चिखली तालुक्यातील नऊ सदस्य असलेल्या आमखेड ग्रा.प.सरपंच पदाचा कारभार गेल्या साडेतीन वर्षांपासून सौ वाघ या सांभळत आहेत . त्यांनी गावांच्या विकासासाठी शासनाकडे तसेच राजकिय नेत्यांकडे पाठपुरावा करूण गावात लाखों रुपयांची कामे मंजूर करूण आणली आणि त्यामधील काही कामे पूर्ण झाली आहेत, परंतु कामाचे बिल ग्रामसेविका माने ह्या काढत नसल्याने सरपंच सौ. विद्या वाघ यांचे लाखों रूपये अडकून पडले आहेत. तसेच गावातही भेटी देत नसल्याने गावकऱ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरपंच सौ विद्या वाघ व त्यांचे पती जगन्नाथ वाघ यांनी अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांच्यात नेहमी काही शुल्लक कारणावरून मतभेद निर्माण आणि किरकोळ वादलाही सुरवात होवू लागली.
वरिष्ठांकडे तक्रार करून बदलीचा आदेश
अशा कारणावरून सरपंच सौ विद्या वाघ आणि त्यांचे पती जगन्नाथ वाघ यांनी वरिष्ठांकडे तक्रार करून बदलीचा आदेश मिळविला. बदलीच्या आदेशाची भनक ग्रा. प.सदस्यांना लागताच लगेच नियमबाह्य झालेली बदली रद्द करण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शविली त्यामुळे ग्रामसेविकेच्या बदली प्रकरणावरून सरपंच व सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आणि त्यात सरपंच व सदस्य हे जवळच्या राजकीय पुढाऱ्याकडे जावून बदली रद्द करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत असल्याने बदलीचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. मात्र या गोंधळात गावातील विकास कामाला ब्रेक बसला आहेत . गोरगरिबांचे घरकुलाचे नवीन प्रस्ताव प. स. सादर करण्यासाठी नागरीकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष देवून बदली प्रकरणाचा निपटारा करावा जेणे करून गावातील विकास कामाला ब्रेक बसणार नाही आणि लोकांचे कामे वेळेवर होतील अशी अपेक्षा गावकरी करत आहेत .