मानोरा (washim):- मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वसंतनगर पोहरादेवी ग्राम पंचायतीला प्रधानमंत्री आवास योजनेचे(Pradhan Mantri Awas Yojana) घरकुलाचे लक्ष केवळ २ देण्यात आले आहे. त्यामुळे उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी बिडीओ यांना लेखी निवेदन देऊन आठवडा उलटूनही न्याय न मिळाल्याने पोहरादेवी ग्राम पंचायतचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मंडळी आज १९ सप्टेंबर पासून उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन बिडियो यांना दिले आहे.
ग्राम पंचायत वसंतनगर पोहरादेवीचा इशारा
निवेदनात नमूद केले आहे की, वसंतनगर पोहरादेवी ग्राम पंचायतीला प्रधानमंत्री आवासयोजनेचे उद्दिष्ट कमी दिल्यामुळे वाढवून देण्याची मागणी आठवडा भरापूर्बी गट विकास अधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्ही ग्राम पंचायतचे उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ मंडळी गुरुवार पासून उपोषणाला बसणार असल्याचे पुन्हा तक्रार देवून न्यायाची मागणी केली आहे. निवेदनावर ग्राम पंचायतचे सरपंच गणेश जाधव यांची स्वाक्षरी आहे.