परभणी/पाथरी(Parbhani): पाथरी विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षाच्या 50 पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे 24 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला, याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांची भावना लक्षात घेता पाथरी मतदारसंघ शिवसेनेसाठी (Shivsena)सोडून घेण्याची घोषणा केली.
मानवत तालुक्यातील जवळपास ५० पदाधिकारी यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश
पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी सोनपेठ परभणी ग्रामीण आणि मानवत तालुक्यातील जवळपास ५० पदाधिकारी यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश सोहळा मुंबई (Mumbai)येथील मुख्यमंत्री यांच्या नंदनवन निवासस्थानी रात्री १ वाजता पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे(Nationalist Congress) माजी प्रदेश सरचिटणीस तथा पाथरी चे माजी नगराध्यक्ष मुंजाजी भाले पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा प्रचार प्रमुख हभप सारंगधर महाराज, शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मधुकर निरपणे, पाथरी न . प .चे माजी नगरसेवक किरण भाले पाटील, विश्वनाथ भाले पाटील, माजी नगरसेवक हनीफ कुरेशी, शेख खालेद,परभणी येथील बबन अण्णा मुळे, ज्ञानोबा पारधे, शिवाजी दंडवटे, ज्ञानोबा पुंड,मुंजा लोखंडे, बाबा पारधे, एकनाथ लोखंडे, राजेश तिडके , हरिभाऊ लोखंडे, प्रल्हाद आव्हाड, पांडुरंग लोखंडे,मधुकरराव खरवडे, कुमार चव्हाण,माणिक अळसे भारत आव्हाड, अरुण घाडगे, धनंजय चव्हाण, गणेश यादव, मुसा भाई, सिद्धेश्वर चव्हाण, कारभारी लोकरे, मजीत बागुल शेख, अशोक मुळे,दत्ता राम मुळे, तुकाराम साठे, रत्नेश्वर साठे, ज्ञानोबा येवले,कृष्णा सूर्यवंशी, बालाजी शिंदे,परमेश्वर भंडारे, रियाज शेख , शरद काळ भारत,गोपीनाथ जाधव, विष्णू चव्हाण आदी मान्यवरांचे प्रवेश करण्यात आले.