पुसद (Pus dam) : हरितक्रांतीचे प्रणेते आता महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून पुसद भविष्यातील शेतकऱ्यांना नागरिकांना सिंचनाकरिता पिण्याच्या पाण्याकरिता कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. या दृष्टीने (Pus dam) पूस धरण ( वसंत सागर) ची निर्मिती व बांधणी केली. विशेष म्हणजे हे संपूर्ण तया मातीचे बांधकाम असलेले धरण आहे. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे पुसद तालुक्यासह शहरामध्ये कधीही पाणीटंचाई जाणवली नाही, हे विशेष.
या धरणामध्ये दि. 23 जुलै रोजी येथील जलसंपदा विभागाचे उप अभियंता अविनाश भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणामध्ये सध्या 63.08% जलसाठा असल्याची माहिती त्यांनी दिली. तर पुढील महिन्यात एक-दोन पावसामध्येच (Pus dam) धरण ओवर फ्लो होण्याची शक्यता ही त्यांनी यावेळी दैनिक देशोन्नती जवळ बोलताना व्यक्त केली. धरण परिसरात496 एमएम पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांच्या सिंचनाकरिता व नागरिकांना पिण्याकरिता पुढील काळात या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.