शहराच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही- डॉ. अंकुश लाड
परभणी/मानवत (Beldar Samaj) : शहरातील राजगल्ली गालिब नगर परिसरामध्ये असलेल्या (Beldar Samaj) बेलदार समाजासाठी दोन कोटी रुपयाचे निधी देऊन बेलदार समाज मंगल कार्यालय भव्य दिव्य उभारणार असल्याची ग्वाही मानवत शहराचे युवा नेते डॉ.अंकुश लाड यांनी बोलताना दिली.
शहरातील राजगल्ली गालिब नगर परिसरामध्ये गेल्या काही वर्षापासून (Beldar Samaj) बेलदार मंगल कार्यालय आहे. पण त्याची बिकट अवस्था झाली आहे. त्या कार्यालयामध्ये लग्न सभारंभ करताना बेलदार समाजास अडचणीचा सामना करावा लागत होता. ही बाब समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या कानावर घातली त्यामुळे डॉ.लाड यांनी तातडीने भव्य मंगल कार्यालय बांधण्यासाठी शब्द दिला होता. तो शब्द मंगळवार १ ऑक्टोंबर रोजी डॉ.लाड यांनी पूर्ण केला आहे. या परिसरामध्ये स्वत: येऊन मंगल कार्यालयाची पाहणी केली असता बेलदार समाज बांधवांच्या वतीने डॉ. लाड यांचा सत्कार करुन त्यांचे आभार मानण्यात आले.
या सत्कारांला उत्तर देताना युवानेते डॉ.लाड म्हणाले की, शहरांमध्ये सर्व जाती धर्मांसाठी मी सभागृह दिले आहे. सर्व (Beldar Samaj) समाजाला समान न्याय देण्याचा मी प्रयत्न करत असतो. बेलदार समाजाचे भव्य सभागृह होणार असून येत्या काळात मानवत शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. विकासकामे अविरत पणे चालुच राहणार असल्याचे सांगितले. यावेळी अनीस राज,नियामत खान, रशीद अन्सारी ,हबीब भडके,बशीर बेलदार ,सत्तार राज,युसुफ बेलदार ,करीम राज,मुन्सर बेलदार ,नवीद बेलदार ,चाँद बेलदार ,शकिल राज ,वहाब बेलदार ,रफिक राज ,करीम लतीफ राज याच्यांसह बेलदार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.