न्यायालयाने दिली दोन दिवस पोलीस कोठडी
देशोन्नती वृत्तसंकलन
कोरपना (Gadchandur Bomb found) : गडचांदूर येथील बसस्थानक परिसरातील संविधान चौक येथील भगवती एन एक्स या कापड दुकानासमोर ३० जुलै रोजी दुपारच्या सुमारास (Gadchandur Bomb) बॉम्ब ठेवल्याची घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व (Gadchandur Police) गडचांदूर पोलिसांनी काही तासातच दोन जुळ्या भावांना अटक केली असून आयुष धाबेकर वयवर्ष २३ पियुष धाबेकर वयवर्ष २३ दोघेही रा. चिमूर, हल्ली वैशाली नगर वार्ड क्रमांक ६ गडचांदूर, असे आरोपींची नावे आहे. हे दोघेही गडचांदूर येथे ‘पंतप्रधान जल योजने’चे काम पेटी काँट्रॅक्टमध्ये घेऊन करत होते. यांनीच दुकानात बॉम्ब ठेवल्याची माहिती कापड दुकानाचे मालक शिरीष सुर्यकांतराव बोगावार यांना दूरध्वनीवरून दिली होती. शिरीश यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांना सदरची माहिती दिली.
सर्वत्र खळबळ; शहरात आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू
घटनेची गंभीरता लक्षात घेता ठाणेदार कदम यांनी लगेच पोलीस पथक पाठवून दूकानासमोर झडती घेतली.त्यावेळी संशयास्पदरीत्या ठेवलेली एक कापडी पिशवी दिसून आली.दुरून पाहीले असता त्यात लाईट टिपटिप करत असल्याचे निदर्शनास आले.त्यावरून ठाणेदार कदम यांनी सदरची माहीती जिल्हा पोलीस अधीक्षक, यांना दिली. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे (Gadchandur Police) पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.तसेच बॉम्ब शोधक पथक चंद्रपूर व गडचिरोली यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या सहाय्याने बॉम्ब निकामी करण्याचे काम राबविण्यात सुरूवात झाली.
गडचांदूर पोलीस आणि एलसीबीची उल्लेखनीय कामगिरी
दरम्यान आरोपीच्या शोध कामी गडचांदूर पोलीस पथक व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, उपविभाग (Gadchandur Police) गडचांदूरातील वेगवेगळी पथके तयार करून रवाना करण्यात आली.त्यावेळी घटनास्थळाबाहेरील सीसीटीव्ही फूटेज व कौशल्यपूर्ण,तांत्रिक तपास करून चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व गडचांदूर पोलिसांनी दोन संशयित तरूणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जामूळे कापड दुकादाराला फोनकरून खंडणी मागण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याची कबूली दिली. दरम्यान (Gadchandur Bomb) बॉम्ब निकामी करण्याकामी पाहणी केली असता बॉम्ब हा बनावटी असल्याचे दिसून आले. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून नायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात सुरू आहे.