कोरची (Gadchiroli Accident) : कोरची येथील राष्ट्रीय महामार्गावरून मार्निंग वाक ला निघालेल्या जिल्हा परिषदेत कार्यरत (Teacher accident) शिक्षकाला मोटार सायकलने धडक दिली. त्यामुळे शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार, नेहमी प्रमाणे राजकुमार फुलसिंग कोडापे वय 49 रा. कोरची हे सकाळी 6 च्या दरम्यान आपल्या राहते घरून मार्निंग वाक ला निघाले. कोरची येथील लोक कोरची ते बेडगांव, कोरची ते मोहगांव, कोरची ते पकनाभट्टी, कोरची ते भिमपूर रोड, कोरची ते गुटेकसा या मार्गे सकाळी आणि सायंकाळी फिरायला जातात. परंतु जास्तीत जास्त लोक कोरची ते बेडगाव या मार्गाने जातात. हा रस्ता (Highway Accident) राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्यावरून रात्रंदिवस जड वाहनांसह सगळ्याच प्रकारची वाहने जातात.
अशातच आज सकाळी 6 .च्या दरम्यान राजकुमार कोडापे हे बेडगाव कडून कोरची कडे परत येत होते. त्याच्या विरुद्ध दिशेने मोटारसायकल स्वार सदाराम ग्यानसिंग आचला (50) रा. साल्हे ( छत्तीसगढ) हे मोटारसायकलने बेडगाव कडे जात असताना गाडीवरून नियंत्रण सुटल्याने (Gadchiroli Accident) धडक दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गुरुजींना दवाखान्यात दाखल करण्यासाठी लोकांनी 108 गाडी बोलावून ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. डॉ. आशिष ईटनकर, डॉ. जयश्री कुळसिंगे यांनी प्राथमिक उपचार करून (Gadchiroli Hospital) जिल्हा रुग्णालयात रेफर केले.
या मार्गावर मार्निंग वाकला जाणाऱ्या अशोक करंजेकर या शिक्षकाला 2021 ला असेच मोटारसायकलने धडक मारली होती. त्यात करंजेकर यांचा मृत्यू झाला होता. मार्निंग वाकला जाणाऱ्या लोकांनी या मार्गाने जावू नये. ईतर मार्ग आहेत. आपली सुरक्षा महत्त्वाची समजून मार्निंग वाक ला जाने आवश्यक आहे.