एटापल्ली(Etapalli):- एटापल्ली तालुक्यातील पेठा, बारसेवाडा तसेच बुर्गी पोलीस ठाणे हद्दीतील गुंडापुरी येथील जादुटोण्याच्या(sorcery) कारणावरून घडलेल्या घटना संपत नाही तोच एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथही आरोपींनी एका ६० वर्षीय वृद्धास मारहाण(Beating the old man) करून व त्यास जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या समयसुचकतेने त्या वृद्धाचे प्राण वाचल्याची घटना ३० एप्रिल रोजी गट्टा येथे घडली. दलसू मुक्का पुंगाटी ( ६०) रा.जांभियागट्टा असे बचावलेल्या ईसमाचे नांव आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजू कोकोसी जोई (६०), झुरू मल्लू पुंगाटी(५४ )बाजू कोकोसी जोई (५५)रेणू मल्लू पुंगाटी (५० ),मैनु दुंगा जोई( ३९ ),शंकर राजू जोई (३१),दिनकर बाजू जोई (२६) तसेच विजू गोटा होळी या आरोपींना अटक(arrested)केली आहे.
प्राप्त माहितीनुसार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी रात्री ०८:०९ च्या सुमारास गैर कायद्याची मंडळी जमवून व संगणमत करून जांबियागट्टा येथील फिर्यादी दलसू मुक्का पुंगाटी यास पकडुन, हात पाय दोरीने बांधून लाथा, बुक्क्यांनी व काठाने मारहाण केली. सब्बलने शरीरावर बर्याच ठिकाणी डागुण जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याचे नशिब बलवत्तर म्हणून एटापल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुकडे, सहाय्यक निरीक्षक शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दलसु मुका पुंगाटी याला आरोपीच्या तावडीतून सुटका करून सोडविले व त्याचा जीव वाचविला.
त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचार सुरू आहेत. आरोपींना दिनांक १ मे पासून ४ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे