गडचिरोली (Gadchiroli):- जिल्ह्यातील टिपागड परिसरातील उंच पहाडीवर नक्षल्यांनी लपवून ठेवलेले 9 आयईडी बॉम्ब,3 क्लेमोर व इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केल्याने नक्षल्यांचे मनसुबे उधळले गेले आहेत.
त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट
नक्षल्यांची शोध मोहीम राबवत असताना पोलिसांना काल 5 मे रोजी रोजी टिपागड परिसरात एक पिन पॉईंट स्थान उघडकीस आले होते. त्याठिकाणी डोंगरावर ही स्फोटके(Explosives) आणि त्यावर माती टाकण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी ताबडतोब 02 BDDS संघांसह C60 ची एक तुकडी आणि CRPF ची एक QAT असलेली एक टीम डंपचा शोध घेण्यासाठी आणि गरज पडल्यास ती नष्ट करण्यासाठी तैनात करण्यात आली.
आज 6 मे रोजी सकाळी जेव्हा पथके घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना स्फोटके आणि डिटोनेटरने(Detonator) भरलेले 06 प्रेशर कुकर(Pressure cooker) आणि स्फोटकांनी भरलेले 03 क्लेमोर पाईप्स आणि श्रापनेल्स देखील सापडले. उर्वरित 3 क्लेमोअर पाईप्स कोणतेही स्फोटक नसलेले होते. पथकांना त्याच ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेट(blanket) सापडले. पोलिसांनी एकूण 9 आयईडी (IED) आणि 3 क्लेमोर पाईप्स (Claymore Pipes)बीडीडीएस टीमने घटनास्थळी नष्ट केले.