– विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळ
– बैठकीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या समस्या व त्या पुर्ण करण्यासाठी करावयाच्या उपायोजना
या बाबत सविस्तर चर्चा
गडचिरोली ( Gadchiroli ) : नागपूर येथे विदर्भ (Vidarbha ) पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन (pending irrigation ) प्रकल्पावर मंथन करण्यात आले. या बैठकीत जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या समस्या व त्या पुर्ण करण्यासाठी करावयाच्या उपायोजना या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गडचिरोली विधानसभा (Gadchiroli Assembly) क्षेत्रात अनेक सिंचन प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून त्यांना निधी उपलब्ध करून काम सुरू करण्याची आवश्यकता तसेच चीचडोह बॅरेज सिंचन प्रकल्पात शेत जमीन गेलेल्या नागपूर येथे विदर्भ पाटबंधारे शेतकऱ्यांना ( farmers ) योग्य मोबदला देऊन विकास जमिनीचे अधिग्रहण करावे अशी अधिकाऱ्यांसोबत सूचना आ. डॉ. देवराव होळी (Dr. Devrao Holi) यांनी बैठकीमध्ये केली. महामंडळाच्या झालेल्या आ.डॉ. होळी यांनी उपस्थित केले विविध मुद्दे या प्रसंगी आयोजित बैठकीला विदर्भ विकास पाटबंधारे (Vidarbha Development) महामंडळाचे कार्यकारी संचालक सोनटक्के, मुख्य अभियंता पवार, अधीक्षक अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता झोड, सहाय्यक अभियंता श्रेणी- १ मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.चीचडोह (Cheechdoh) सिंचन प्रकल्प सुरू होवून बराच कालावधी झाला. मात्र त्यात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण अजूनपर्यंत झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करून त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी भाजपा नेते (BJP Leader) उपस्थित होते. धोडरे, शेतकरी देवनाथ बोधलकर, प्रकाश गव्हारे, देवाजी जुवारे, सतीश भांडेकर, अशोक धोडरे, प्रदीप साखरे गणेश
या बाबीवर करण्यात आली चर्चा
चामोर्शी तालुक्यातील ( Chamorshi Taluka ) राजीव उपसा सिंचन योजना भेंडाळा, वसा-पोर्ला उपसा सिंचन योजना, रेगडी कन्नमवार जलाशयाचे पाणी टेल (शेवट) पर्यंत पोहोचत नसल्याने रेगडी जलाशयाच्या कालव्याची दुरुस्ती करणे, पीडिएन द्वारे पाणीपुरवठा करून गोगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे, रेगडी जलशयातून नवीन उपसा सिंचन योजना सूरू करणे, बंद पडलेली अनखोडा सिंचन योजना सुरू करून पीडिएन द्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे, या सिंचन प्रकल्पांना आवश्यक असणाऱ्या मंजुरी देऊन त्यासाठी लागणारा असणारा निधी उपलब्ध करून द्यावा अशी सूचना आ. डॉ. देवराव होळी यांनी या बैठकीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांकडे केली